Viral Video : लॉकडाऊनमधे केलेली दोन दिवसांची त्याची मेहनत काही सेकंदात गेला वाया, कशी ती बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:28 IST2020-04-19T15:21:47+5:302020-04-19T15:28:44+5:30

अनेकजण या वेळेचा काहीतरी चांगला फायदा करून घेत आहेत. तर काही लोक फारच विचित्रपणे त्यांचा वेळ घालवत आहेत.

Video : Man falls on pyramid of cups he spent 2 days building in lockdown api | Viral Video : लॉकडाऊनमधे केलेली दोन दिवसांची त्याची मेहनत काही सेकंदात गेला वाया, कशी ती बघा!

Viral Video : लॉकडाऊनमधे केलेली दोन दिवसांची त्याची मेहनत काही सेकंदात गेला वाया, कशी ती बघा!

जगातले जास्तीत जास्त देश हे कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहेत. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांकडे आता वेळच वेळ आहे. अनेकजण या वेळेचा काहीतरी चांगला फायदा करून घेत आहेत. तर काही लोक फारच विचित्रपणे त्यांचा वेळ घालवत आहेत.

आता घरात आहोत म्हणून अमेरिकेतील एका व्यक्तीने ग्लासच्या माध्यमातून पिरॅमिड तयार करण्याला सुरू केली. ही काही फार नवीन गोष्ट नक्कीच नाही. अनेकांनी हे अनेकदा केलं आहे. अनेकांना कार्ड्सचं पिरॅमिड तयार केलं असेलच.

या व्यक्तीने त्याच्या घरात एक ग्लासच्या मदतीने एक भलामोठा पिरॅमिड जवळपास पूर्णही उभारला. पण शेवटच्या क्षणी जरा घोळ झाला आणि तो यात अपयशी ठरला. याचाच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

आता काही लोकांना याचं वाईट वाटलं तर काही लोक म्हणताहेत की हा व्हिडीओ फेक आहे. म्हणजे तो चुकीच पडला नाही तर ते ठरवून करण्यात आलं आहे.

काही असो सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर असं काही ट्राय करायला हरकत नाही.


Web Title: Video : Man falls on pyramid of cups he spent 2 days building in lockdown api