VIDEO: चालू सामन्यात मैदानात शिरला अन् गर्लफ्रेंडला प्रपोज केले; मग झाली अशी अवस्था...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 13:56 IST2023-04-23T13:55:53+5:302023-04-23T13:56:53+5:30

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO: Man entered the field and proposed to his girlfriend during the ongoing match; Then it happened | VIDEO: चालू सामन्यात मैदानात शिरला अन् गर्लफ्रेंडला प्रपोज केले; मग झाली अशी अवस्था...

VIDEO: चालू सामन्यात मैदानात शिरला अन् गर्लफ्रेंडला प्रपोज केले; मग झाली अशी अवस्था...

तुम्ही अनेकदा खेळाच्या मैदानात तरुणाने तरुणीला लग्नासाठी प्रपोज केल्याचे पाहिले असेल. बहुतांशवेळा असे केल्याने अडचण येत नाही, पण एका तरुणाला मैदानात आपल्या तरुणीला प्रपोज करणे चांगलेच महागात पडले. तरुण सुरक्षा ओलंडून खेळाच्या मैदानात शिरला आणि गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करू लागला. 

हा व्हिडिओ रिकार्डो जुआरेज नावाच्या व्यक्तीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये जुआरेज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉजर स्टेडियममध्ये त्याची गर्लफ्रेंड रमोना सावेद्राला प्रपोज करताना दिसत आहे. यावेळी मैदानात बेसबॉलचा सामना सुरू होता. स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक उपस्थित होते. तो मैदानात गेला आणि प्रपोज करायला गुडघ्यावर बसला. 

तेवढ्यात सुरक्षा रक्षक धावत येतात आणि जुआरेजला पकडतात. ते त्याला हातकडी घालतात आणि उचलून मैदानाबाहेर घेऊन जातात. हा व्हिडिओ 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणाले- गार्डने जुआरेजला एवढ्या जोरात ढकलण्याची गरज नव्हती, तर कुणी म्हणाले हा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

काहींनी प्रपोज करण्याची ही पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जुआरेजने गर्लफ्रेंड रमोनासोबत आणखी एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याने लग्नाचा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
 

Web Title: VIDEO: Man entered the field and proposed to his girlfriend during the ongoing match; Then it happened