Dhoom Viral Boy: 'किरिश का गाना सुनेगा...' असं म्हणतं 'क्रिश' चित्रपटातील गाणे गाणाऱ्या मुलाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फक्त हाच नाही, तर या मुलाचे इतर काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा मुलगा कोण आहे, कुठे राहतो आणि काय करतो? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
कोण आहे हा मुलगा?
या व्हायरल मुलाचे नाव 'धूम' असून, तो झारखंडमधील जमशेदपूर शहराचा रहिवासी आहे. शहरात कचरा वेचून उदनिर्वाह करणाऱ्या अनाथ मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने धूम रातोरात स्तार झाला. सध्या इंस्टाग्राम आणि फेसबूकसारख्या प्लॅटफॉर्म्सवर धूमच्या गाण्याचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. 'मीम'च्या दुनियेत तर धूम स्टार झाला आहे. सध्या धूमची चर्चा होत असली तरी, त्याचे आयुष्य खूप हलाखीच्या परिस्थितीत गेले आहे.
NGO चा पुढाकार...
‘धूम’चे खरे नाव पिंटू असून, तो कचरा वेचणे आणि लहान-मोठी कामे करून आपले पोट भरतो. तो व्यसनाच्याही खूप आहारी गेला आहे. सोशल मीडियावरील लोकप्रियतेनंतर अनेक यूट्यूबर्स त्याच्याभोवती जमा होऊन आपल्या पद्धतीने त्याचा वापर करू लागले. यादरम्यान, एका स्वयंसेवी संस्थेचे लक्ष पिंटूकडे गेले. संस्थेने त्याला आपल्या ताब्यात घेऊन व्यसनमुक्ती आणि वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. संस्था संचालकांच्या मते, वेळीच त्याला इथे आणले नसते, तर तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला असता. सुरुवातीला तो नशेशिवाय काहीही बोलू शकत नव्हता. मात्र, आता त्याची परिस्थिती सुधारत आहे.
आता जुने मित्र दूर ठेवले...
उपचार केंद्रातील अनुभव सांगताना पिंटू म्हणाला, इथे खूप बरं वाटतं. चांगले जेवण मिळते. इथले भैया खूप मदत करतात. बाहेर कोणाशी मैत्री नाही. जुने मित्र आता दूर ठेवले आहेत. त्यांच्या संगतीत गेलो तर पुन्हा नशेत अडकण्याची भीती आहे. ते ‘धूम-धूम’ करून वास देतात, ते फार धोकादायक आहे. कामाबाबत मला भीती नाही. मी मेहनत करू शकतो. काम द्या, मी ते करून दाखवतो, अशी प्रतिक्रिया धूमने दिली.
धूम कायम नशेत असायचा
NGO चे संचालक प्रतीक कुमार यांनी सांगितले, आम्हाला धूमबद्दल इंस्टाग्रामवरून माहिती मिळाली. तो कायम नशेत असायचा. लोक फक्त 50-100 देऊन त्याच्याकडून काम करुन घ्यायचे. व्यसनाव्यतिरिक्त त्याला काविळ (जॉन्डिस) आणि यकृताचा संसर्ग होता. त्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही तपासण्या बाकी आहेत. तो पूर्ण सहकार्य करत आहे. त्याच्यात प्रचंड टॅलेंट आहे. योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तो खूप पुढे जाऊ शकतो. त्याला दुबईवरुन विविध कार्यक्रमांसाठी बोलवणे येत आहे, असेही संचालकांनी सांगितले. यावरुनच धूमच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.
Web Summary : Dhoom, an orphan from Jamshedpur, Jharkhand, became a viral sensation singing a 'Krish' song. Addicted, he's now in rehab, supported by an NGO. Offers are pouring in from Dubai for shows, highlighting his talent and potential for a brighter future.
Web Summary : जमशेदपुर, झारखंड का एक अनाथ, धूम, 'क्रिश' गाना गाकर वायरल हो गया। नशे की लत लगने के बाद, अब वह एक एनजीओ द्वारा समर्थित पुनर्वास में है। दुबई से शो के लिए प्रस्ताव आ रहे हैं, जो उसकी प्रतिभा और उज्जवल भविष्य की क्षमता को उजागर करते हैं।