VIDEO : दिव्यांग व्यक्तीसोबत लक्झरी कारच्या मालकाने केलं असं काही, बघून इमोशनल झाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:31 IST2024-08-12T14:30:26+5:302024-08-12T14:31:15+5:30
Heart Touching Video: एका दिव्यांग व्यक्तीला असा अनुभव आला ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की, जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे.

VIDEO : दिव्यांग व्यक्तीसोबत लक्झरी कारच्या मालकाने केलं असं काही, बघून इमोशनल झाले लोक!
Heart Touching Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक भावूक करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कधी कुणी गरीबांची मदत करताना दिसतं तर कधी रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना आनंद देताना दिसतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका दिव्यांग व्यक्तीला असा अनुभव आला ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की, जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या महागड्या पोर्श लक्झरी गाडीसमोर एक दिव्यांग व्यक्ती सेल्फी घेत आहे. तेव्हाच गाडीचा मालक तिथे येतो. कारचा मालक येताना पाहून दिव्यांग व्यक्ती घाबरून पळून जातो. त्याला वाटतं की, कारचा मालक त्याला काही वाईट बोलेल किंवा रागवेल. पण असं काही होत नाही. उलट कारचा मालक असं काही करतो ज्याची दिव्यांग व्यक्तीने कल्पनाही केली नसेल.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कारचा मालक या दिव्यांग व्यक्तीचे कारसोबत काही फोटो काढतो. इतकंच नाही तर त्यानंतर तो त्याला कारमध्ये बसवतो आणि फिरवून आणतो. या लक्झरी कारमध्ये बसून प्रवास करण्याचा आनंद दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. दिव्यांग व्यक्तीला झालेला आनंद पाहून कारच्या मालकाच्या चेहऱ्यावरही हसू फुलतं. हा व्हिडीओ seenu.malik.365 नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून यावर ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.