'India is not for beginner', काकांनी चक्क विजेच्या हायव्होल्टेज तारांवर वाळवले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 20:25 IST2024-12-27T20:24:05+5:302024-12-27T20:25:18+5:30
Jugaad Viral Video: हायव्होल्टेज तारांवर कपडे वाळवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'India is not for beginner', काकांनी चक्क विजेच्या हायव्होल्टेज तारांवर वाळवले कपडे
Uncle Drying Clothes On Electric Wire: विजेच्या तारेला हात लावल्यावर जोराचा करंट लागून मृत्यू होण्याची भीती असते. त्यामुळे अशा तारांना हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एका व्यक्तीने चक्क विजेच्या तारांवर ओले कपडे वाळत घातले.
व्हायरल व्हिडिओमध्ये छतावर उभा असलेला एक व्यक्ती विजेच्या तारांवर कपडे वाळवताना दिसतोय. तेवढ्यात दुसरा एक व्यक्ती त्याला थांबवतो. 'भाऊ असं करू नको. तुम्हाला विजेचा धक्का बसेल,' असे तो व्यक्ती म्हणतो. पण, गच्चीवरील व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कपडे वाळवणे चालू ठेवतो. पण, त्यानंतर इतरही काही लोक त्याला समजावून सांगतात. त्यानंतर तो तारेवरचे कपडे काढतो.
व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "हा तर डेंजर प्लेयर आहे." दुसऱ्याने लिहिले, "तारेत वीज येणार नाही, माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे." हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच India is not for beginner, म्हणाल.