Video: अचानक भडकलेल्या नवरीने नवरदेवाच्या तोंडावर फेकला हार आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:28 IST2021-12-06T15:26:14+5:302021-12-06T15:28:12+5:30
Social Viral : आपलं लग्न खास करण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीना काही स्पेशल करत असतात. अनेकदा ते स्टेजवर असं काही करतात ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या व्हिडीओत असंच काही आहे.

Video: अचानक भडकलेल्या नवरीने नवरदेवाच्या तोंडावर फेकला हार आणि मग...
Social Viral : सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात लग्नातील एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. एक नवरदेव त्याच्या नवरीला स्टेजवर हार घालत असतो. पण इतक्यात असं काही होतं की, उपस्थित सर्वांनाच धक्का बसतो.
तसा तर लग्नाचा दिवस परिवार आणि नातेवाईकांसाठी खास असतो. पण सर्वात खास असतो तो नवरी आणि नवरदेवासाठी. आपलं लग्न खास करण्यासाठी नवरी आणि नवरदेव काहीना काही स्पेशल करत असतात. अनेकदा ते स्टेजवर असं काही करतात ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या व्हिडीओत असंच काही आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, स्टेजवर नवरदेव त्याच्या नवरीच्या गळ्यात मोठ्या प्रेमाने हार घालतो. नवरदेव जसाही नवरीच्या गळ्यात हार घालतो, तशी नवरी अचानक चिडते. त्यानंतर ती अचानक हार नवरदेवाच्या अंगावर फेकून स्टेजवरून खाली निघून जाते. यावेळी उपस्थित लोक हे सगळं बघून हैराण होतात.
काही क्षणातच जे काही होतं ते बघून लोक हैराण होतात. आश्चर्याची बाब म्हणजे काही वेळाने नवरी पुन्हा स्टेजवर येते आणि मग बाकी लोक हसू लागतात. मुळात नवरीने नवरदेवासोबत एक प्रॅंक केलेला आहे.
याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत स्टेजवर नवरदेव प्रेमाने नवरीला रसगुल्ला खाऊ घालत असतो. पण नवरी फारच नखरे दाखवते आणि ती रसगुल्ला खात नाही. यात नवरदेवही कमी नाही, तो स्वत:चा रसगुल्ला खातो.