सासू भलतीच ढासू! पाकिस्तानी सासूने जावयाला लग्नात गिफ्ट दिली AK-47; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 06:22 PM2020-11-27T18:22:22+5:302020-11-27T18:26:34+5:30

Viral Video in Marathi : तुमचा विश्वास बसणार नाही पण लग्नात नवऱ्या मुलाला त्याच्या सासूने चक्क एके-47 गन  गिफ्ट दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

Video : Groom gets ak 47 in wedding gift video viral on social media | सासू भलतीच ढासू! पाकिस्तानी सासूने जावयाला लग्नात गिफ्ट दिली AK-47; पाहा व्हिडीओ

सासू भलतीच ढासू! पाकिस्तानी सासूने जावयाला लग्नात गिफ्ट दिली AK-47; पाहा व्हिडीओ

Next

लग्नात नवरा-नवरीला आपल्या संसारासाठी लागत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. तसंच काही पैश्यांची पाकिटंही असतात. पण लग्नात कधी  दाम्पत्याला  हत्यार गिफ्ट दिलेलं तुम्ही ऐकलंय का? तुमचा विश्वास बसणार नाही पण लग्नात नवऱ्या मुलाला त्याच्या सासूने चक्क एके-47 गन  गिफ्ट दिली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ नक्की कुठला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. 

हा प्रकार पाकिस्तानमधील असल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या आदिल अहसान या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने ट्विटरवर स्वत:ला तो समा टीव्हीचा पत्रकार असल्याचं म्हटलंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्नात एक महिला नवऱ्यामुलाला गिफ्ट म्हणून रायफल देत आहे. यावेळी लग्नात उपस्थित असलेले पाहुणेही आनंदात आरडाओरड करत आहेत.

अरे यारर्रर्रर्र ...! असं म्हणत न्हाव्याला धमकी देणारा हा चिमुरडा आहे तरी कोण?

या व्हिडीओतील पाहुण्यांच्या आरडाओरडी वरून त्यांच्यासाठी ही मोठी गौरवाची गोष्ट असल्याचे लक्षात येत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव झाला असून हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कारण अशा प्रकारे सासूने जावयाला एके -47 दिल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी. हे गिफ्ट पाहून नवरामुलगा सुद्धा सुरूवातीला आश्चर्यचकित होतो नंतर त्याला हसायला येतं. बाबो! 'या' व्यक्तीच्या ६ गर्लफ्रेन्ड एकत्र आहेत गर्भवती, कधी गळ्यात साखळी बांधून फिरवत होता मुली...

Web Title: Video : Groom gets ak 47 in wedding gift video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.