VIDEO : लग्नात नवरदेवाने भरलं स्वत:च्या भांगेत कुंकू, नवरीचे हावभाव पाहून पोटधरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:13 IST2024-07-22T15:12:39+5:302024-07-22T15:13:25+5:30
Viral Video : एक नवरदेव फारच कन्फ्यूज झाला. त्याने नवरीच्या भांगेत कुंकू भरण्याऐवजी आपल्याच भांगेत कुंकू भरलं.

VIDEO : लग्नात नवरदेवाने भरलं स्वत:च्या भांगेत कुंकू, नवरीचे हावभाव पाहून पोटधरून हसाल!
Viral Video : लग्न आणि लग्नातील रितीरिवाज नेहमीच महत्वाचे असतात. सप्तपदी असो वार हार टाकण्याच्या रिवाज असो...नंतर मंगळसूत्र टाकणं आणि मग भांगेत कुंकू भरणं. लग्न कुठेही असो हे रिवाज कॉमन आहेत. तरीही काही भागांमध्ये लग्नात वेगवेगळे रिवाज केले जातात. जे सगळ्यांनाच माहीत असतात. पण एक नवरदेव फारच कन्फ्यूज झाला. त्याने नवरीच्या भांगेत कुंकू भरण्याऐवजी आपल्याच भांगेत कुंकू भरलं. नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जय गोगा डेकोरेशन नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर नवरदेवाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेव कसा भांगेत कुंकू भरणं विसरतो आणि स्वत:च्या भांगेत कुंकू भरतो. हे बघून नवरीच अचंबित होते. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलं आहे की, 'नवरी म्हणत आहे पागल तुझ्या नाही माझ्या भांगेत कुंकू भर'.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर यूजर्स यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "याला सेल्फ लव्ह म्हणजे स्वत:वर प्रेम करणं म्हणतात". तर दुसऱ्याने लिहिलं की, हा मुलगा बॉईल कॉलेजमध्ये शिकला असेल".