कट मारण्याच्या प्रयत्नात स्कूटीवरून पडली तरूणी, मागच्या गाडीवाल्याला म्हणाली - हे तू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:43 IST2025-01-24T12:42:58+5:302025-01-24T12:43:30+5:30

Viral Video : धडकेनंतर तिची स्कूटी खाली पडते आणि ती पडण्यापासून वाचण्याचा प्रयत्नही करते. हैराण करणारी बाब म्हणजे या पूर्ण दुर्घटनेचा दोष तरूणी मागच्या बाइकस्वाराला देते.

Video : Girl fell from scooter while trying to hit a bike | कट मारण्याच्या प्रयत्नात स्कूटीवरून पडली तरूणी, मागच्या गाडीवाल्याला म्हणाली - हे तू...

कट मारण्याच्या प्रयत्नात स्कूटीवरून पडली तरूणी, मागच्या गाडीवाल्याला म्हणाली - हे तू...

Viral Video : सोशल मीडियावर आणखी एका स्कूटी चालवणाऱ्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तिने तिच्या ड्रायव्हिंगनं एकच गोंधळ केला आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, स्कूटी गर्ल रस्त्यावरून साइड कट मारण्याचा प्रयत्न करत होती. पण यादरम्यान ती एका ई-रिक्षाला धडक देते. धडकेनंतर तिची स्कूटी खाली पडते आणि ती पडण्यापासून वाचण्याचा प्रयत्नही करते. हैराण करणारी बाब म्हणजे या पूर्ण दुर्घटनेचा दोष तरूणी मागच्या बाइकस्वाराला देते.

व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की, स्कूटी खाली पडल्यानंतर तरूणी संतापते आणि मागच्या बाइकस्वाराला काहीबाही बोलू लागते. जे ऐकून बाइकवालाही हैराण होतो. ती त्याला म्हणाली की, "हे तू काय केलं?". पण मुळात चूक तरूणीची होती.

आपली चूक मान्य करण्याऐवजी अपघाताचा पूर्ण दोष दुसऱ्यावर टाकला. या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.  लोक सुद्धा हे बघून हैराण झाले की, तरूणीची चूक असूनही तिने दुसऱ्यावर आरोप केला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे आणि लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. बऱ्याच लोकांचं हेच मत होतं की, तरूणीचं वागणं चुकीचं होतं. तिने तिची चूक मान्य करायला हवी. तर काही लोकांनी काही मजेदारही कमेंट्स केल्या आहेत. viral_ka_tadka नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Web Title: Video : Girl fell from scooter while trying to hit a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.