Video: नागिन डान्स विसरा, आता आला 'स्पेंडर डान्स'; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:55 IST2023-04-27T19:54:29+5:302023-04-27T19:55:43+5:30

नागिन डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, पण हा डान्सचा प्रकार अतिशय वेगळा आहे.

Video: Forget Naagin Dance, now comes 'Spender Dance'; You will be amazed by the video | Video: नागिन डान्स विसरा, आता आला 'स्पेंडर डान्स'; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

Video: नागिन डान्स विसरा, आता आला 'स्पेंडर डान्स'; व्हिडिओ पाहून चकीत व्हाल...

Viral Video: लग्नात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात DJ सुरू झाला की, लोकांचे पाय थिरकायला लागतात. सोशल मीडियावर अशा कार्यक्रमातील चित्र-विचित्र डान्सचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. नागिन डान्स, कोंबडा डान्स किंवा मोर डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण, सध्या एका नवीन डान्स प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

सध्या सोशल मीडियावर 'स्पेंडर डान्स' चा व्हिडिओ व्हायरल होतोय. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एका कार्यक्रमात गावातील लोक DJ च्या आवाजावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी काही तरुणांनी एका स्पेंडर बाईकला डोक्यावर उचललेलं आणि त्या बाईकवर एक तरुण डान्स कताना दिसत आहे. डान्सचा हा नवीन प्रकार पाहून नेटकरीदेखील चकीत झाले आहेत. 

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपले हसू आवरण कठीणे झाले आहे. हा व्हिडीओ babari_sound_king नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या डान्सवर टीका केली आहे तर काहींनी या डान्सचे कौतुक केले आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. 
 

Web Title: Video: Forget Naagin Dance, now comes 'Spender Dance'; You will be amazed by the video