VIDEO : केक कापणार इतक्यात चेहऱ्याला अचानक लागली आग आणि.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:51 IST2021-03-25T13:51:05+5:302021-03-25T13:51:43+5:30
हा व्हिडीओ आपल्याला हेही शिकवून जातो की, आनंद साजरा करताना काय करू नये. यात बघायला मिळतं की, एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते.

VIDEO : केक कापणार इतक्यात चेहऱ्याला अचानक लागली आग आणि.....
प्रत्येकालाच आपल्या बर्थ डे च्या दिवशी स्पेशल फील होत असतं. या दिवशी घरातील लोक आणि मित्र वाढदिवस असलेल्या व्यक्तीला सरप्राइजही देतात. तसेच या दिवशी ग्रॅंड सेलिब्रेशन आणि केक कटींगही केलं जातं. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणी असं काही घडतं की, आनंद दु:खात बदलतो. असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोबतच हा व्हिडीओ आपल्याला हेही शिकवून जातो की, आनंद साजरा करताना काय करू नये. यात बघायला मिळतं की, एक तरूण केक कापणार असतो, पण अशात एका मित्राकडून करण्यात आलेली गंमत कशी महागात पडते.
बर्थ डे केस कापणार असलेल्या तरूणाला याचा अंदाजही नसेल की, त्याच्यासोबत केस कापताना असं काही होणार आहे. केक कापण्यासाठी त्याने चाकू घेतला आणि इतक्यात त्याच्या मित्राने चेहऱ्यावर स्नो स्प्रे स्प्रे केला. केकवरील स्पार्कलर कॅंडलही पेटलेली होती. अशात बर्थ डे बॉय चेहऱ्यावरील स्नोनेही पेट घेतला. तो आग विझवण्यासाठी धडपडत होता.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओतील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. अनेकांनी अशा घटनांवर संपात व्यक्त केला. एका यूजरने लिहिले की, 'जास्तीत जास्त लोक हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये हसत आहेत. पण यात हसण्यासारखं काहीच नाही. कारण आपल्याला माहीत नाही त्याचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे. आशा आहे की, तो ठीक असेल'.