Fake Sheikh Premanand: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळा २०२५ मधील वेगवेगळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात वेगवेगळे इन्फ्लुएन्सर वेगवेगळ्या साधू बाबांची माहिती देत आहेत. तर कुणी आपल्या सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल होत आहे. अशीच एक व्यक्ती शेखची वेशभूषा करून कुंभमेळ्यात आली. आधी लोकांना वाटलं की, तो खरच अरबचा शेख असेल. पण नंतर खुलासा झाला की, तो एक कंन्टेन्ट क्रिएटर आहे. तो केवळ व्हिडिओसाठी असे कपडे घालून आला होता.
या व्यक्तीनं हा व्हिडीओ स्वत:ला "शेख प्रेमानंद" नावानं सादर केलं. त्याच्यासोबत दोन इतर लोक होते, जे ये-जा करणाऱ्या लोकांना त्याची ओळख द्यायचे आणि फेक नाव सांगायचे. त्यांचा उद्देश केवळ एक प्रॅंक व्हिडीओ बनवणं हाच होता. पण हा प्रॅंक व्हिडीओ त्याच्यावरच उलटा फिरला. काही वेळात लोकांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली.
महाकुंभ मेळा हे एक पवित्र धार्मिक आयोजन आहे. ज्यात भारतातीलच नाही तर जगभरातील लोक आलेत. अशात या व्यक्तीचा हा प्रॅंक लोकांना आक्षेपार्ह वाटला. गर्दीनं त्याला घेरलं आणि त्याचा विरोध केला. त्यानंतर त्यानं सत्याचा खुलासा केला. तेव्हा लोक आणखी नाराज झाले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर यूजर्सनी सुद्धा त्याला खडेबोल सुनावले. एका यूजरनं लिहिलं की, 'हा कुंभ मेळा आहे, फॅशन शो नाही'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'साधुंनी योग्य ते केलं'. हे एक ऐतिहासिक धार्मिक आयोजन असून इथे गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान केलं जातं.