अचानक तुमच्यासमोर रस्त्यात हत्ती आल्यावर काय होईल? पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:11 IST2020-04-03T18:09:29+5:302020-04-03T18:11:30+5:30

कुठे मोर, तर कुठे हत्ती असे वेगवेगळे प्राणी बाहरे यायला सुरूवात झाली आहे.

Video of elephants walking into streets this is how people are reacting myb | अचानक तुमच्यासमोर रस्त्यात हत्ती आल्यावर काय होईल? पहा व्हायरल व्हिडीओ

अचानक तुमच्यासमोर रस्त्यात हत्ती आल्यावर काय होईल? पहा व्हायरल व्हिडीओ

सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव  लक्षात घेता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच बसाव लागत आहे. पण यामुळे निसर्गातील प्राणी-पक्ष्यांचं वेगळं रुप सगळ्यांना पहायला मिळतयं  कुठे मोर, तर कुठे हत्ती असे वेगवेगळे प्राणी बाहेर यायला सुरूवात झाली आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. 

हा व्हिडीओ डेहरादूनचा आहे. हा व्हिडीओ आईएफएस ऑफिसर वैभव सिंह यांनी शेअर केला आहे. यात रस्त्यावर चक्क  ह्त्ती आला आहे. हा हत्ती दुधवाल्याच्या समोर आला आहे.  त्यानंतर पुढे काय होतंय बघून तुम्हाला दुधवाल्या माणसावर हसू येईल.

 या व्हिडीओमध्ये दुधवाला माणूस बाईकवरून येत असताना त्याला हत्ती दिसतो. त्यानंतर कसलाही विचार न करता तो माणूस बाईकवरून उतरतो आणि पळत सुटतो. पण ह्त्ती शांतपणे आपल्या गतीने पुढे जात आहे.

Web Title: Video of elephants walking into streets this is how people are reacting myb