Video - आयडियाची कल्पना! तरुणाचा भन्नाट देसी जुगाड; बाईकला बनवली 7 सीटर कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:55 IST2023-06-14T16:46:38+5:302023-06-14T16:55:58+5:30
एका व्यक्तीने चक्क बाईकला 7 सीटर कार बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

Video - आयडियाची कल्पना! तरुणाचा भन्नाट देसी जुगाड; बाईकला बनवली 7 सीटर कार
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. अनेकदा भारतीय ही म्हण अगदी तंतोतंत पाळतात. लोक अशा प्रकारचे काही देसी भन्नाट जुगाड करतात जे पाहून सर्वच जण हैराण होतात. वाहनांच्या बाबतीत असा प्रकार नेहमीच पाहायला मिळतात. असाच काहीसा जुगाड उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चक्क बाईकला 7 सीटर कार बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
लखनौ-अयोध्या महामार्गावर बाराबंकी शहरातून जाताना एक हटके गाडी पाहायला मिळत आहे. बाईकवर एक व्यक्ती असून त्याच्यासोबत जवळपास आठ जण बसले आहेत. समोर बाईकवर तीन जण होते, तर बाकीचे पाच लोक एका लाकडी गाडीवर आरामात बसले होते. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. लांबून पाहिलं तर ही साधी गाडी वाटते पण जवळून पाहिल्यावर जुगाड लक्षात येतो.
गाड़ी का देसी जुगाड़ #DesiJugaadpic.twitter.com/mlTDv6MYqo
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) June 14, 2023
गाडीवरही नंबर नाही. दुसरीकडे, या जुगाड करून तयार केलेल्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांना एकतर याच्या धोक्याची कल्पना नाही किंवा त्यांनी जाणूनबुजून आपला जीव धोक्यात घातला आहे. म्हणायला ही बाईक आहे, पण इंजिनशिवाय त्यात दुसरं काही नाही. बाईक चालवणार्या व्यक्तीने जुन्या बाईकमध्ये अशाप्रकारे बदल केले आहेत जे पाहून सर्वच हैराण झाले. जुगाडी बाईकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.