सिंहाच्या समोर अचानक आला किंग कोब्रा, बघा जंगलाच्या राजाची कशी झाली हालत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:19 IST2025-02-24T13:18:56+5:302025-02-24T13:19:28+5:30

Viral Video : व्हायरल व्हिडिओत बघू शकता की, एक कोब्रा एका मातीच्या ढिगाऱ्यावर फणा काढून बसला आणि सिंहाकडे एकटक बघत आहे.

VIDEO : Cobra suddenly came in the way of lion watch what happen next | सिंहाच्या समोर अचानक आला किंग कोब्रा, बघा जंगलाच्या राजाची कशी झाली हालत!

सिंहाच्या समोर अचानक आला किंग कोब्रा, बघा जंगलाच्या राजाची कशी झाली हालत!

Viral Video : सोशल मीडिया प्राणी आणि जंगली जीवांचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सापांचे तर कितीतरी व्हिडीओ रोज बघायला मिळतात. सापांचे वेगवेगळे आणि सिंहाचे शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या एक किंग कोब्रा आणि सिंहाचा आमना-सामना झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर heavenly_nature_1 पोस्ट करण्यात आला आहे. जो बघू लोक अवाक् झाले आहेत. यात सिंह आणि कोब्रा समोरासमोर दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत बघू शकता की, एक कोब्रा एका मातीच्या ढिगाऱ्यावर फणा काढून बसला आणि सिंहाकडे एकटक बघत आहे. सिंह सापाकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साप फणा आणखी उंच करत सिंहाला आव्हान देतो. हा नजारा फारच रोमांचक आहे. कारण किंग कोब्राच्या आक्रामकतेनंतरही सिंह हिंमत दाखवतो. सिंहाला जेव्हा कोब्राच्या ताकदीची जाणीव होते, तो घाबरून मागे सरकतो. 

व्हिडिओच्या शेवटी बघू शकता की, सिंह काही वेळ कोब्राच्या आजूबाजूला फिरतो. आधी तर असं वाटतं की, सिंह सापाची शिकार करण्यास तयार आहे, पण जसजसा कोब्रा आपला फणा आणखी उंच करतो तेव्हा सिंह जरा घाबरतो. त्याची चाल हळू होते आणि शेवटी त्याला समजतं की, कोब्रासोबत पंगा घेणं काही बरोबर राहणार नाही. हळूहळू तो मागे सरकतो आणि नंतर तिथून निघून जातो.

हा नजारा लोकांना आश्चर्यकारक वाटला कारण सामान्यपणे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. तो एक शक्तीशाली शिकारी मानला जातो. पण या व्हिडिओत तो सर्तकता आणि समजदारीनं काम घेतो. 

दरम्यान, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत लोकांमध्ये वाद पेटला आहे. कारण काही लोकांचं मत आहे की, हा व्हिडीओ पूर्णपणे ओरिजनल आहे तर काही लोकांचं मत आहे की, हा व्हिडीओ आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. 

तरीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांना खूप आवडला देखील. व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच लोक हा अद्भूत नजारा बघून अवाक् झाले आहेत.
 

Web Title: VIDEO : Cobra suddenly came in the way of lion watch what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.