लग्नात काम करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित असलेल्यांपैकी एकानं खरं काय ते पोस्ट केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 10:36 IST2021-07-26T07:19:03+5:302021-07-26T10:36:31+5:30
हे वर्णन वाचून प्रश्न पडला असेल, की नेमके काय झाले. तर एका मराठमाेळ्या लग्नात ही माेठी गंमत झाली.

लग्नात काम करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित असलेल्यांपैकी एकानं खरं काय ते पोस्ट केले
मुंबई : काेराेना महामारीच्या काळात ‘वर्क फ्राॅम हाेम’ अर्थात घरातूनच काम करण्याची संकल्पना रुजली. घरात बसून काम करताना अनेकांना गमतीशीर अनुभवांना सामाेरे जावे लागले. आताही एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा फाेटाे व्हिडीओ आहे एका लग्नातला आणि त्यात चक्क नवरदेव बाेहल्यावर चढण्यापूर्वी लॅपटाॅप मांडीवर घेऊन काम करताना दिसत आहे. तर त्याच्या या अवस्थेवर नवरी खदखदून हसताना दिसते.
हे वर्णन वाचून प्रश्न पडला असेल, की नेमके काय झाले. तर एका मराठमाेळ्या लग्नात ही माेठी गंमत झाली. लग्नमंडपात नवरदेव लॅपटाॅप घेऊन काम करताना दिसताे. तर, भटजींसह इतर मंडळी त्याच्या प्रतीक्षेत बसलेले दिसतात. नवरी मात्र निवांतपणे बसून अगदी खदखदून हसताना दिसते. तिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काही मिनिटांतच नवरदेव काम पूर्ण करून लॅपटाॅप दुसऱ्याला देताे आणि लग्नासाठी उभा राहताे.
लग्न मंडपात शेवटच्या क्षणापर्यंत नवरदेव लॅपटॉपवर काम करताना दिसतोय, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल. #SocialViralpic.twitter.com/tjGMPoS2c9
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2021
काम करत नव्हता तर...
स्वत:च्या लग्नापेक्षा एवढे महत्त्वाचे काय असू शकते, हा प्रश्न अनेकांना पडला. अखेर या लग्नात उपस्थित असलेल्या काहींनी खरं काय ते पाेस्ट केले. नवरदेव काम करत नव्हता तर ताे व्हिडीओ काॅल सेटअप करत हाेता. जेणेकरून इतर निकटवर्तीयांना व्हर्च्युअल पद्धतीने हजेरी लावता यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेटकरी म्हणतात...
यावर मजेदार कॅप्शन्स नेटकऱ्यांनी टाकल्या. हे वर्क फ्राॅम हाेम नव्हे तर ‘वर्क फ्राॅम वेडिंग’ असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. अनेकांनी नवरदेवाच्या साहेबांचा ‘उद्धार’ केला. काहींनी ताे पूर्व प्रेयसीची छायाचित्रे डिलीट करत असेल, अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी कामाच्या ताणावरून अतिशय गंभीर प्रतिक्रिया दिल्या.