Video: ‘रिवॉल्वर राणी’! लग्नात स्टेजवर जाण्याआधी नवरीकडून गन फायरिंग, घाबरला नवरदेव....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:38 IST2021-06-01T15:37:44+5:302021-06-01T15:38:19+5:30
सोशल मीडियात हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात ३० मे रोजी एका लग्नातील आहे.

Video: ‘रिवॉल्वर राणी’! लग्नात स्टेजवर जाण्याआधी नवरीकडून गन फायरिंग, घाबरला नवरदेव....
अनेकदा काही राज्यांमध्ये आपण पाहतो की, लग्नात नवरदेवाचे मित्र बंदुकीने फायरिंग करतात. मुळात हा प्रकार कायद्याने चुकीचाच आहे. अनेकदा तर लग्नात अशावेळी काही लोकांना गोळ्या लागून त्यांचा जीवही जातो. हे करून लोक आपला मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात चक्क एक नवरी बंदुकीने फायर करताना दिसत आहे.
सोशल मीडियात हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात ३० मे रोजी एका लग्नातील आहे. इथे एक नवरी लग्नाच्या स्टेजवर जाण्याआधी दबंग स्टाइलमध्ये रिवॉल्वरने गोळी झाडताना दिसली. प्रतापगढच्या जेठवारा पोलीस स्टेशन भागात लग्नादरम्यान नवरी स्टेजवर जात असताना रिवॉल्वरने हवेत फायरिंग करत आहे. यावेळी नवरदेवही बाजूला असतो. पण तो जरा घाबरलेला दिसतो.
गन वाली दुल्हनिया
— Manish Mishra (@mmanishmishra) June 1, 2021
ज़िन्दगी का पहला कदम तमंचे के साथ। क्या होगा दूल्हे का!!
वीडियो यूपी प्रतापगढ़ के जेठवारा थानाक्षेत्र का है। पुलिस अब एक्शन में है। pic.twitter.com/PF1oIxBIOk
कोरोना काळात लग्नासंबंधी काय नियम घालून देण्यात आले आहेत. पण या लग्नात नवरी-नवरदेव विना मास्क दिसत आहे. तसेच लोकांचीही मोठी गर्दी लग्नात दिसत आहे. इतकंच नाही तर या लग्नात सोशल डिस्टंसिंहचाही फज्जा उडालेला दिसत आहे.