चुलीवर भाकरी करणाऱ्या सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल, का ते तुम्ही बघा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:53 IST2021-06-02T14:51:45+5:302021-06-02T14:53:48+5:30
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. काही तासांमध्येच या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कारण यातील तरूणीचा साधेपणा आणि सुंदरता लोकांना आवडली आहे.

चुलीवर भाकरी करणाऱ्या सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल, का ते तुम्ही बघा...
अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ बघायला मिळतात ज्यात आश्चर्यजनक काही बघायला मिळतं. ज्यावर आपला विश्वास बसत नाही. पण काही व्हिडीओ असेही असतात ज्यात आश्चर्यजनक असं काही नसतं, पण ते व्हिडीओ बघण्यासारखे असतात. असाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी चुलीवर भाकरी करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. काही तासांमध्येच या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. कारण यातील तरूणीचा साधेपणा आणि सुंदरता लोकांना आवडली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका गावात एक तरूणी अंगणातील चुलीवर भाकरी करते आहे. भाकरी करताना कुणीतरी तिचा हा व्हिडीओ काढला. व्हिडीओ काढत असताना ती तिचं काम करत राहते. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला आहे. कारण यातील तरूणीची स्माइल आणि तिची सुंदरता लोकांच्या मनात भरली आहे. (हे पण बघा : शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...)
जॅस्मीन सॅनी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त वेळ बघण्यात आलं आहे. तर १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. इतकंच नाही तर यातील तरूणीच्या सौंदर्याबाबत लोक भरभरून कमेंटही करत आहेत. अनेकांनी तिला नॅच्युरल ब्युटी म्हटलं आहे. तर काहींनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही केली आहे.