मृत आईला उठवण्यासाठी गेंड्याच्या पिलाची केविलवाणी धडपड, काळजाला भिडणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 16:42 IST2019-07-03T16:36:53+5:302019-07-03T16:42:25+5:30
सध्या एका गेंड्याच्या पिल्लाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

मृत आईला उठवण्यासाठी गेंड्याच्या पिलाची केविलवाणी धडपड, काळजाला भिडणारा व्हिडीओ
सध्या एका गेंड्याच्या पिल्लाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेच्या जंगलातील असून यात गेंड्याचं पिल्लू त्याच्या मरण पावलेल्या आईला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या मादा गेंड्याची शिकाऱ्यांनी हत्या केली. या व्हिडीओच्या माध्यमातून साऊथ आफ्रिकेतील जंगलात प्राण्यांची कशाप्रकारे कत्तल सुरू आहे हे दाखवलं जात आहे.
The picture of poaching !!
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 2, 2019
A baby #rhino tries to wake #mother, who is killed by poachers for the #horn. Devastating & eye opening. pic.twitter.com/EnAS2PAHiD
हा व्हिडीओ पहिल्यांदा भारतीय वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. सोबतच एक भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. त्यात त्यांनी असंही सांगितलं आहे की, या मादा गेंड्याची हत्या तिच्या शिंगासाठी करण्यात आली आहे.
या व्हिडीओत दिसत आहे की, कशाप्रकारे गेंड्याचं पिल्लू त्याच्या मेलेल्या आईला उठवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पण त्याचा आईला उठवण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ५५ हजार लोकांनी पाहिला असून त्यावर २ हजार ८०० रिअॅक्शन आणि ३८० कमेंट्स आल्या आहेत.