Video..अन् खवळलेल्या कोब्रानं फणा काढून हवेत झेप घेतली; दुचाकीस्वाराला घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:10 IST2023-08-02T15:10:17+5:302023-08-02T15:10:52+5:30

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक कोब्रा रस्त्याच्या मधून जात आहे. तितक्यात बाजूने एक दुचाकी वेगाने जाते.

Video: agitated cobra took off its cover and jumped in the air; The biker sweated | Video..अन् खवळलेल्या कोब्रानं फणा काढून हवेत झेप घेतली; दुचाकीस्वाराला घाम फुटला

Video..अन् खवळलेल्या कोब्रानं फणा काढून हवेत झेप घेतली; दुचाकीस्वाराला घाम फुटला

सोशल मीडियावर अनेक खतरनाक सापांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यात किंग कोब्रा पाहून अनेकांना घाम फुटतो. कधी टॉयेलटमध्ये लपलेला साप तर कधी बाथरूमच्या शॉवरवर लटकलेला साप दिसतो. सोशल मीडियात बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा किंग कोब्राने हल्ला केल्याचेही दिसून येते. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक कोब्रा रस्त्याच्या मधून जात आहे. तितक्यात बाजूने एक दुचाकी वेगाने जाते. या दुचाकीवर २ लोक प्रवास करत असतात. दुचाकीस्वार पुढे निघून गेल्यावर मागे वळून पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. कोब्रा त्याच्या वाटेने जात असताना अचानक दुचाकी वेगाने जाते. त्याचा राग आलेला कोब्रा फणा काढून हवेत झेप घेतो. दुचाकीस्वारांवर त्याने हल्ला असता पण सुदैवाने त्यांनी वेग पकडला आणि पुढे निघून गेले. किंग कोब्राचा हा व्हिडिओ पाहताना अंगावट काटा आल्याशिवाय राहत नाही.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ india.yatra नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक जणांनी पाहिले असून हजारोंनी लाईक्स केले आहे. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने सापाने बाईकवर हल्ला केला ते पाहून कोणाचेही हाल होतील. या व्हिडिओबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? कमेंट करून सांगा.

Web Title: Video: agitated cobra took off its cover and jumped in the air; The biker sweated