VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:56 IST2025-09-24T16:55:58+5:302025-09-24T16:56:29+5:30
Indian Jersey in Pakistan, Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची परिस्थिती आहे.

VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
Indian Jersey in Pakistan, Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एप्रिल महिन्यात काश्मिरच्या पहलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी गोळीबार करून २६ जणांना ठार केले होते. ते दहशतवादी पाकिस्तानातील असल्याचे कळल्यावर भारतीय सैन्यदलाने त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला केला. तसेच, सिंधू जलकरारही स्थगित केला. परिणामी काही दिवस भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगत युद्ध सुरू होते. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेतही याचे पडसाद उमटले. भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन नाकारले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजून वाढल्याचे चित्र दिसले. तशातच सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
ब्रिटिश ट्रॅव्हल व्लॉगर अलेक्स वँडर्सने एक व्हिडीओ शूट केला. त्या व्हिडिओमध्ये, अलेक्स भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून पाकिस्तानातील लाहोरच्या रस्त्यांवर फिरला. या व्हायरल व्हिडिओमध्ये अलेक्स म्हणताना दिसला की, पाकिस्तानच्या रस्त्यावर भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून फिरताना लोकांची प्रतिक्रिया कशी असते ते पाहूया. सुरुवातीला तो रस्त्यावरून चालत असताना, काही लोकांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले. नंतर मात्र काहींनी त्याच्याशी छान गप्पा मारल्या. पाहा व्हिडीओ-
व्हिडिओच्या शेवटी अलेक्स म्हणताना दिसला की, मी भारताची जर्सी घालून फिरलो पण काहीही वाईट घडले नाही. मात्र त्याच्या व्हिडिओवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.