Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:47 IST2025-05-06T11:46:56+5:302025-05-06T11:47:32+5:30
या व्यक्तीच्या घोषणेचा तिथे उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी विरोध केला परंतु त्याने महाराष्ट्र जिंदाबाद अशी घोषणा सुरूच ठेवली.

Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला गेला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातूनच याचे जगभरातील अनेक देशात पडसाद उमटताना दिसतायेत. अनेक देशात भारत-पाक समर्थक एकमेकांविरोधात आंदोलन करत आहेत. त्यातच लंडनमध्ये एका परदेशी व्यक्तीने पाकिस्तानी नागरिकांविरोधात घोषणाबाजी केली. काश्मीर भारताचे आहे असं सांगत त्याने पाक समर्थकांना सुनावत जय महाराष्ट्र, महाराष्ट्र जिंदाबाद असेही नारे दिले.
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत परदेशी नागरिक म्हणतो की, भारत दहशतवादाविरोधात आहे त्यामुळे मी भारतासोबत आहे. महाराष्ट्र जिंदाबाद, जय महाराष्ट्र, काश्मीर भारतात आहे. भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत परदेशी नागरिकाने महाराष्ट्राचे कौतुक केले. या व्यक्तीच्या घोषणेचा तिथे उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी विरोध केला परंतु त्याने महाराष्ट्र जिंदाबाद अशी घोषणा सुरूच ठेवली. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक युजर्स महाराष्ट्राच्या शौर्याचं गौरव करत आहेत.
पाकिस्तानची फजिती
पाकिस्तानला UNSC बैठकीकडून फार अपेक्षा होती. या बैठकीत खोटा बनाव सदस्य मान्य करतील असं पाकला वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर सुरक्षा परिषदेकडून निवेदन जारी केले जाईल असंही पाकिस्तानला वाटत होते. परंतु तेही घडले नाही.यूएनएससीने कुठलेही निवेदन जारी न केल्याने पाकची फजिती झाली.
दरम्यान, भारत पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धाचे ढग पसरले आहेत. त्यातच पाकिस्तानच्या एका मशिदीत झालेल्या घोषणेनंतर पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खैबर पख्तूनख्वा, ज्याठिकाणी तहरीक ए तालिबानचा दबदबा आहे, तिथल्या मशिदीत युद्धाच्या काळात भारतीय सैन्याला साथ देण्याची घोषणा झाली आहे. मशिदीतील मौलानाने केलेली घोषणा समोर आली आहे त्यात त्यांनी युद्ध झाल्यास भारताला साथ देण्याची घोषणा लोकांसमोर केली आहे.