Video of 1 year old baby swimming video going viral | १ वर्षांच्या चिमुकलीचं स्वीमिंग पाहून भल्याभल्यांची बोलती होईल बंद; व्हिडीओ व्हायरल
१ वर्षांच्या चिमुकलीचं स्वीमिंग पाहून भल्याभल्यांची बोलती होईल बंद; व्हिडीओ व्हायरल

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ती निरागस असतात, अशा अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. मुलं अशा अनेक गोष्टी लहान वयातच करतात ज्या मोठी माणसंही करू शकत नाहीत. सोशल मीडियावरही अनेक मुलांच्या करामतींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये 1 वर्षाची चिमुकली कोणाच्याही मदतीशिवाय स्विमिंग करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हे एवढुसं पिल्लू पाण्यामध्ये एखाद्या प्रोफेशनल स्विमरप्रमाणे बॅक स्ट्रोक, फ्रंट क्रॉल आणि स्पिन पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त क वर्षाच्या या मुलीचं अशा पद्धतीने स्वमिंग करणं म्हणजे, चमत्काराच म्हणता येईल. 

रिपोर्ट्सनुसार, फ्लोरिडाचे रहिवाशी असणाऱ्या Grace Fanelli यांना आपल्या मुलींना लहान वयातच स्विमिंग शिकवण्याची इच्छा होती. यामुळे मुलं लहान वयातच पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यातच राहिल्यामुळे त्यांचा कॉन्फिडंट्स वाढतो. 

Grace Fanelli यांच्या दोन मुली आहेत. एक मुलगी 3 वर्षांची आहे तर दुसरी 1 वर्षाची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, Grace Fanelli यांनी आपल्या दोन्ही मुलींना लहान वयातच स्विमिंग मास्टर बनवलं आहे. 

तुम्ही हे जाणून घेऊन हैराण व्हाल की, दोन्ही मुलींना जेव्हा त्या फक्त 9 महिन्यांचा होत्या तेव्हापासूनच त्यांना स्विमिंग शिकवलं होतं. व्हिडीओमध्ये Grace Fanelli यांची लहान मुलगी स्विमिंग करताना दिसत आहे. फक्त एक वर्षाच्या मुलीली स्विमिंग करताना पाहताना एखाद्या चमत्काराप्रमाणेच वाटत आहे. 

Graceने सांगितलं की, वयाच्या 6 महिन्यानंतर मुलं स्विमिंग शिकू शकतात. ते जगभरातील सर्व आई-वडिलांना संदेश देऊ इच्छितात की, स्विमिंग एक आवश्यक स्किल आहे. त्यामुळे सर्व मुलांनी स्विमिंग शिकणं आवश्यक आहे. मुलांना कमी वयातच पाण्यासोबत कम्फर्टेंबल केल्यामुळे त्यांना स्विमिंग शिकणं फार सोपं होतं. 


Web Title: Video of 1 year old baby swimming video going viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.