Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:44 IST2025-08-23T19:40:24+5:302025-08-23T19:44:00+5:30
Viral News: गाझियाबादमधील सिद्धार्थ विहारमधील ब्रह्मपुत्र एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये एका महिलेला भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.

Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
गाझियाबादमधील सिद्धार्थ विहारमधील ब्रह्मपुत्र एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये एका महिलेला भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली .
पीडित महिला ही श्वानप्रेमी असून ती भटक्या कुत्र्यांना खायला देत असताना आरोपी कमल खन्नाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि नंतर तो वाढून मारामारीपर्यंत गेला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महिलेच्या कानशिलात मारताना दिसत आहे. जवळच्या लोकांनी हस्तक्षेप करूनही त्याने मारणे थांबवले नाही. पीडित महिलेच्या बहिणीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ग़ाज़ियाबाद के सिद्धार्थ विहार के भ्रमपुत्र एंक्लेव में गुंडा गर्दी करता हुआ कमल खन्ना रात को अकेली महिला पे अपनी दबंगई दिखाता हुआ ।
— Surbhi Rawat PFA (@surbhirawatpfa) August 23, 2025
इंसानियत की सारी हदे पार करता हुआ ये दुष्ट आदमी है। बिचारी महिला चुप चाप सड़क पे कोने पे भूखे जानवरों को खाना खिला रही थी तभी कमल खन्ना आ के उसको… pic.twitter.com/qPy5eMEmfG
या घटनेवर @surbhirawatpfa या एक्स हँडलवरून व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, "कमल खन्ना नावाच्या व्यक्तीने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जेव्हा पीडित महिला भटक्या कुत्र्याला खायला देत होती, तेव्हा कमल खन्नाने तिची छेड काढली. त्यानंतर कुत्रा भुंकल्यामुळे तो आणखी भडकला आणि त्याने महिलेला मारहाण केली. या घटनेची दखल घेतली पाहिजे."
या प्रकरणाची दखल घेत गाझियाबादचे सहायक पोलीस आयुक्त रितेश त्रिपाठी यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले की, विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.