'या' ठिकाणी सापडला दोन तोंडांचा साप; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 16:34 IST2019-09-06T16:33:41+5:302019-09-06T16:34:52+5:30
आपल्या पृथ्वीवर अनेक चित्रविचित्र जीव आहेत. तर काही जीव अनोख्या रूपात जन्माला आल्यामुळे वेगळे ओळखले जातात. असाच एक साप सध्या चर्चेत आहे.

'या' ठिकाणी सापडला दोन तोंडांचा साप; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
आपल्या पृथ्वीवर अनेक चित्रविचित्र जीव आहेत. तर काही जीव अनोख्या रूपात जन्माला आल्यामुळे वेगळे ओळखले जातात. असाच एक साप सध्या चर्चेत आहे. अमेरिकेमध्ये एक दोन तोंडांचा साप सापडला आहे. या सापाचं धड एकच असून त्याला चार डोळे आणि दोन तोंडं आहेत.
अमेरिकेतील न्यूजर्सी येथे पर्यावरण सल्लागार (Environmental Consultant) यांना दोन तोंडं असलेला साप पकडला आहे. ABC News ने दिलेल्या वृत्तानुसार, हा साप दोन लोकांनी पकडला होता. जे बर्लिंगटन काउंटीमध्ये हर्पेटोलॉजिकल एसोसिएट्स म्हणून काम करतात. या सापाचं नामकरणंही करण्यात आलं आहे. डेव नावाच्या व्यक्तीने हा साप पकडला होता म्हणून या सापाचं नाव डबल डेव असं ठेवण्यात आलं आहे.