भयंकर विध्वंस होणार? इस्रायलच्या आकाशात हजारो कावळे घिरट्या घालताहेत, कारण...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 23:49 IST2026-03-25T23:40:37+5:302026-03-25T23:49:13+5:30

इंटरनेटवर विध्वंसाचे संकेत म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. हे दृश्य पाहून लोकांच्या मनातही दहशत निर्माण झाली आहे.

US Israel Iran War: Footage showing thousands of crows flying across the Israel Tel Aviv skyline is going viral | भयंकर विध्वंस होणार? इस्रायलच्या आकाशात हजारो कावळे घिरट्या घालताहेत, कारण...; Video व्हायरल

भयंकर विध्वंस होणार? इस्रायलच्या आकाशात हजारो कावळे घिरट्या घालताहेत, कारण...; Video व्हायरल

तेल अवीव - इराणशी युद्ध सुरू असलेल्या इस्रायलच्या राजधानी तेल अवीवच्या आकाशात मंगळवारी एक अजब आणि हैराण करणारे दृश्य पाहायला मिळाले. याठिकाणी अचानक हजारोंच्या संख्येने कावळे घोंगावताना दिसले. हजारो कावळे उंच उंच इमारती, प्रसिद्ध अजरिली टॉवर्सला घिरक्या घालत असल्याचे दृश्य लोकांनी कॅमेऱ्यात कैद केले. पाहता पाहता हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओबाबत अनेकांनी भयंकर विध्वंस होणार असल्याचे संकेत आहेत असा दावा केला. 

इंटरनेटवर विध्वंसाचे संकेत म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. हे दृश्य पाहून लोकांच्या मनातही दहशत निर्माण झाली आहे. या रहस्यमय घटनेबाबत अनेकांनी एखाद्या मोठ्या धोक्याचे संकेत असल्याचे म्हटलं आहे. काही लोकांनी या घटनेला धार्मिक भविष्यवाणीशीही जोडले आहे. त्यात Books of Revelation या पुस्तकाचा दाखला देत काहींनी एखादे मोठे संकट येऊ शकते असा दावा केला आहे. बायबलमधील बुक ऑफ रेवेलेशन १९:१७ चा संदर्भ देऊन काहींनी सूर्यामध्ये उभा असलेला एक देवदूत आकाशातील पक्ष्यांना हाक मारून त्यांना एकत्र जमून 'देवाच्या महान मेजवानीला' उपस्थित राहण्यास सांगत आहे असंही म्हटलं आहे.

या घटनेचा संबंध इराण इस्रायल युद्धाशीही जोडला जातोय

अनेक प्रत्यक्षदर्शींनी या भयावह दृश्याचा संबंध इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीशी जोडला आहे, जिथे इराणसोबत तणाव सुरू आहे. आणि हे दृश्य येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे सूचक आहे, असा युक्तिवाद केला आहे. कावळ्यांच्या या घिरट्या घालणाऱ्या थव्यामुळे आकाशात गडद, ​​सरकणाऱ्या ढगांसारखे दृश्य निर्माण झाले, ज्यामुळे या प्रचंड स्थलांतराचे प्रमाण पाहून रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी आश्चर्यचकित झाले.

पक्षी शास्त्रज्ञांचे युक्तिवाद काय?

दुसरीकडे पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, ही एक अलौकिक घटना नसून जगातील सर्वात व्यस्त पक्षी उड्डाण मार्गांपैकी एका मार्गावरील एक सामान्य हंगामी स्थलांतर आहे. दरवर्षी वसंत ऋतूत उत्तरेकडे स्थलांतर करताना अंदाजे ५० कोटी पक्षी इस्रायलमधून जातात आणि घरटे बांधण्याच्या हंगामात कावळे अनेकदा शहरांमध्ये एकत्र येतात असं तज्ञांचे म्हणणे आहे. इस्रायल 'ग्रेट रिफ्ट व्हॅली फ्लायवे' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर वसलेले आहे, जो जगातील सर्वात व्यस्त पक्षी स्थलांतर मार्गांपैकी एक आहे. दरवर्षी या काळात लाखो पक्षी आफ्रिकेतून युरोप आणि आशियाकडे उड्डाण करतात. इस्रायल या पक्ष्यांसाठी एक प्रमुख संक्रमण बिंदू म्हणून काम करते, त्यामुळे आकाशात मोठ्या संख्येने पक्षी दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कावळे, बगळे, पेलिकन आणि इतर अनेक शिकारी पक्षी देखील या काळात या भागातून जातात. असे दृश्य दरवर्षी या हंगामात पाहायला मिळते, परंतु यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ते अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सादर केले जात आहे असंही बोलले जाते.

Web Title : इज़राइल के आसमान में हज़ारों कौवे: क्या यह विनाश का संकेत है?

Web Summary : तेल अवीव में हज़ारों कौवों के झुंड से दहशत फैल गई, जिसे भविष्यवाणी और ईरान के तनाव से जोड़ा गया। विशेषज्ञों ने पक्षी प्रवास का हवाला देते हुए प्रलय के सिद्धांतों को कम आंका। मौसमी प्रवास सामान्य है।

Web Title : Thousands of crows in Israel's sky: Omen of destruction?

Web Summary : Thousands of crows swarming Tel Aviv sparked fear, linked to prophecy and Iran tensions. Experts cite bird migration, downplaying doomsday theories. Seasonal migration is normal.