अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:50 IST2025-11-08T12:48:28+5:302025-11-08T12:50:19+5:30
ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला.

अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
एखाद्या तरुणीचं लग्न तिच्या नकळत चकून झालं असेल, यावर तुमचा विश्वास बसू शकतो का? मात्र, अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनी पोर्टरने, आपला निकाह मलेशियाचे माजी राजा आणि केलंतनचे सुल्तान मुहम्मद पंचम यांच्याशी अनवधानाने झाला, असा दावा केला आहे. ब्रिटनीच्या मते, ती ज्याला एन्गेजमेंट समजत होती, तो प्रत्यक्षात तिचा निकाह होता. नंतर तिला समजले की हा समारंभ म्हणजे इस्लामी कायद्यानुसार विवाह होता. ती आता तलाक घेण्याचा विचार करत आहे.
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, ब्रिटनी आणि सुल्तान यांची ओळख जानेवारी 2024 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली. मित्रांच्या माध्यमातून झालेल्या या भेटीनंतर त्यांच्यात लगेचच जवळीक निर्माण झाली. ब्रिटनी म्हणाली की, सुरुवातीला ते फक्त मित्र होते, पण सततच्या संवादानंतर, त्यांच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. या काळात त्यांनी मित्रांसह मध्यपूर्व आणि थायलंडला प्रवासही केला.
एप्रिल 2024 मध्ये ओमानच्या प्रवासादरम्यान आपल्या नात्यात हे वळण आले. ब्रिटनीने सांगितले की, तेथे एका इमामला बोलावण्यात आले आणि आपले धर्मपरिवर्तन करण्यात आले. आपल्याला इस्लामसंदर्भात फारशी माहिती देण्यात आली नव्हती. त्या समारंभाला आपण एन्गेजमेंट समजत होतो. कारण दोघांनीही 2025 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर समजले की, तो कार्यक्रम म्हणजे, आपला निकाह, म्हणजेच विवाह होता.
यानंतर ते दोघे मलेशियाला परतले, तेथे ब्रिटनीला ‘चे पुआन’ ही शाही उपाधी देण्यात आली. मात्र, थोड्याच दिवसांत सुल्तानाचे वर्तन बदलू लागले. आम्ही येथे कपडे खरेदी केले. मात्र कपड्यांवरील खर्चामुळे सुल्ताना माझ्यावर नाराज झाले. नतंर, संवाद टाळणे अशा गोष्टी दिसू लागल्या. परिस्थिती अधिकच बिघडली, माझा गर्भपात झाल्यानंतर, माझ्यासोबतचे सुल्तानाचे वागणे पूर्णपणे बदलले. एवढेच नाही तर, त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी माझ्यासोबतचे संबंध पूर्ण पणे तोडले. हे त्यांनी एका मैत्रिणीमार्फत सांगितले.
ब्रिटनीने पुढे सांगितले की, मी प्रचंड घाबरले आणि त्याला भाटण्यासाठी लॉस एंजेलिसहून मलेशियाला गेले. तेथे समजले की सुल्तान सिंगापूमध्ये आहे. मी सिंगापूरला गेले. तो फोर सीझन्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर थांबलेला होता आणि रिसेप्शनवर मला वर जाण्याची परवानगी नव्हती. मी पायऱ्यांनी वर गेले. मात्र, सुल्तानने दरवाजा उघडला नाही. यानंतर मी तेथेच एक रूम घेतली. पण आमचे बोलणे होऊ शकले नाही. अखेर अर्ध्यारात्री तो विमानाने तेथून निघून गेला.
ब्रिटनी म्हणाली, “मी एन्गेजमेंट समजत होते, पण पत्नी झाले आणि आता विभक्त आहे.” मी इस्लाममधील तलाक संदर्भात माहिती मिळवली आणि जुने मेसेज बघितले की, त्याने मला तलाक तर नाही दिला? मात्र असे काहीही नव्हते. मला कधीही कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही.