तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 19:24 IST2024-05-09T19:23:35+5:302024-05-09T19:24:38+5:30
Two women fight in bus Viral video: एकीने कॉलर पकडली तर दुसरीने लाथ मारली... पाहा व्हिडीओ

तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
Two women fight in bus viral video: सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे काहीही व्हायरल होऊ शकते. कधी एखाद्या चांगल्या कृत्यामुळे लोकांची वाहवा होते तर कधी वाईट गोष्टी व्हायरल झाल्याने नेटकरी व्हायरल लोकांवर टीका करताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाणही बरेच आहे. तशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी चांगलेच व्यक्त होताना दिसत आहेत.
अमेरिकेतील एका शहरात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बसमधील महिला प्रवासी आणि महिला ड्रायव्हर यांच्यात हाणामारी होताना दिसते. बस तिकिटाच्या भाड्यावरून हे भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला प्रवासी ड्रायव्हरला बसमधून बाहेर काढत आहे आणि तिला धक्काबुक्की करत आहे. महिला ड्रायव्हर स्वत:ला वाचवण्यासाठी प्रवाशाला लाथ मारण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ही हाणामारी सुरूच आहे. फॉक्स न्यूजने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये महिला चालक “मला सोडा!” असे ओरडताना दिसते. महिला प्रवाशी बळजबरीने महिला ड्रायव्हरला खाली खेचते आणि मग दोघांमध्ये तुंबळ हाणामारी होते असा हा व्हिडीओ आहे. नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त होताना दिसत आहेत.