Tiger Fight Video : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ तर असे असतात जे बघून थरकाप उडतो. तर कधी असेही व्हिडीओ बघायला मिळतात, जे बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या कान्हा रिझर्वमधील दोन वाघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पर्यटकांनी दोन वाघांच्या फाइटचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्वमध्ये सफारीचा आनंद घेत असलेल्या एका पर्यटकानं हा अद्भुत नजारा पाहिला. ज्यात दोन वाघांची तूफान फाइट सुरू आहे. २६ सेकंदाची ही क्लिप रवींद्र मणि त्रिपाठी यानी एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. ते कान्हा रिझर्वचे फीलड डायरेक्टर आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्यानी लिहिलं की, 'पर्यटकानं राष्ट्रीय उद्यानात आपल्या सफारी दरम्यान वाघांच्या जोरदार भांडणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
वाघ आपल्या भांडणात बिझी होते. पण काही सेकंदात ते थांबले. कारण त्यातील एका वाघानं हार मानली होती. त्रिपाठी यानी व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं की, 'दोन टायटन्समध्ये लढाई. आमच्या पर्यटकानं कान्हा टायगर रिझर्वमध्ये दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला. लोक वाघांच्या लढाईचा व्हिडीओ बघून थक्क झाले आहेत. अनेकांना त्यांचा थरकाप उडल्याचंही सांगितलं.