मुलीने ऑर्डर केल्या दोन कानशिलात, डिलिव्हरी झाली एक्स बॉयफ्रेंडच्या घरी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 18:49 IST2021-07-11T18:48:25+5:302021-07-11T18:49:40+5:30

एका गर्लफ्रेंडने मात्र तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरात एक खास सरप्राईज डिलिव्हर केलं. तेही ऑनलाईन ऑर्डर करून. हे सरप्राईज बघुन तुम्हाला धक्का तर बसेलच पण तुम्ही या गर्लफ्रेंडच्या हुशारीचीही दाद द्याल...

Two slaps ordered by the girl, delivered to ex boyfriend's house .... | मुलीने ऑर्डर केल्या दोन कानशिलात, डिलिव्हरी झाली एक्स बॉयफ्रेंडच्या घरी....

मुलीने ऑर्डर केल्या दोन कानशिलात, डिलिव्हरी झाली एक्स बॉयफ्रेंडच्या घरी....

या ऑनलाईन जमान्यात सगळ्याची डिलिव्हरी होते. तुम्ही एक क्लिक दाबायचा अवकाश ती वस्तू तुमच्या दारात असते. बरेचदा लोक ऑनलाईन डिलिव्हरी करून आपल्या प्रियजनांना गिफ्टही देतात. सध्या कोरोनाच्या काळात तर हा ऑनलाईन डिल्हिवरीचा व्यवसाय भलताच तेजीत आहे. लोकं घरबसल्या आपल्या आवडीच्या वस्तू मागवतात. एका गर्लफ्रेंडने मात्र तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरात एक खास सरप्राईज डिलिव्हर केलं. तेही ऑनलाईन ऑर्डर करून. हे सरप्राईज बघुन तुम्हाला धक्का तर बसेलच पण तुम्ही या गर्लफ्रेंडच्या हुशारीचीही दाद द्याल...


आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहुन नेटिझन्स हैराण झाले आहेत. सगळ्यांना प्रश्न पडलाय की खरंच अशा वस्तू ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतात का?
या व्हिडिओत असं दाखवलंय की एक डिलिव्हरी बॉय एका तरुणाच्या घरी जातो आणि त्याच्या दोन कानाखाली मारतो. हे पाहुन तो बिचारा तरुण शॉक होतो. तो डिलिव्हरी पूर्ण झाल्याची सही देखील करतो. त्यानंतर हा डिलीव्हरी बॉय त्याला सांगतो की तुझ्या एक्स गर्लफ्रेंडने हे गिफ्ट तुझ्यासाठी ऑर्डर केलं होतं. तिने फक्त दोन कानाखालीच ऑर्डर केल्या होत्या कारण ठोसा महाग होता. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.

Web Title: Two slaps ordered by the girl, delivered to ex boyfriend's house ....