दोन शार्कमध्ये शिकारीवरून झालं भांडण, खतरनाक व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 12:34 IST2021-05-03T12:31:21+5:302021-05-03T12:34:10+5:30
एक खतरनाक व्हिडीओ समोर आला असून यात दोन शार्कचं भांडण दाखवण्यात आलंय. हे भांडण इतकं डेंजर आहे की, बघताना आपल्याला धडकी भरते.

दोन शार्कमध्ये शिकारीवरून झालं भांडण, खतरनाक व्हिडीओ व्हायरल...
अनेक हॉलिवूड सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, शार्क मासा कशाप्रकारे हल्ला करतो. अनेकदा तर त्याचा खतरनाक टोकदार दातांचा जबडा पाहूनच भंबेरी उडते. एकदा जर कुणी त्या दातांमध्ये अडकलं गेलंच म्हणून समजा. अनेक सिनेमात असे सीन आपण पाहिले असतील. असाच एक रिअल व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन शार्कचं भांडण दाखवण्यात आलंय. हे भांडण इतकं डेंजर आहे की, बघताना आपल्याला धडकी भरते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ २०१९ नॅशनल जिओग्राफीची डॉक्युमेंट्री 'कॅनिबल शार्क'चा आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन शार्क शिकारीसाठी आपसात भिडतात. (हे पण वाचा : Crab viral video : भूक लागताच खेकड्यानं सफरचंदावर मारला ताव; १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ)
Steve Morris नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ कॅप्चर केला होता. यात समुद्रात दोन शार्क दिसत आहेत. आधी दोन्ही शार्क भांडत नाहीत तर एकमेकांसोबत दिसतात. नंतर त्यांच्यात भांडण होतं. त्यावेळी शार्क कसा हल्ला करतो हे बघायला मिळतं. हा व्हिडीओ २०१८ सालचा असल्याचं सांगितलं जात आहे.