VIDEO : नाल्यात एकमेकांना बुडवत दोघांची फ्री स्टाईल हाणामारी, तिसऱ्याने येऊन केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:32 IST2024-10-26T13:05:53+5:302024-10-26T13:32:50+5:30
Fight Viral Video : सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती नाल्यातील घाणीत भांडण करताना दिसत आहेत.

VIDEO : नाल्यात एकमेकांना बुडवत दोघांची फ्री स्टाईल हाणामारी, तिसऱ्याने येऊन केलं असं काही...
Fight Viral Video : भांडण ही एक अशी गोष्ट आहे जे कुणाचं कुणासोबत कधी होईल काहीच सांगता येत नाही. भांडणं तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पाहिली असतील. कधी समोरासमोर पाहिली असेल किंवा व्हिडिओत पाहिली असेल. पण गटारात झालेलं कुणाचं भांडण तुम्ही पाहिलं नसेल...तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती नाल्यातील घाणीत भांडण करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, दोन्ही नाल्यात लोळून लोळून एकमेकांना हाणामारी करत आहेत. दोघेही एकमेकांना बेदम मारत आहेत. दोघांचेही शरीर चिखलाने माखलेले आहेत. साधारण 15 मिनिटांनी यात एका तिसऱ्या व्यक्तीचं एंट्री होते. जो हातात झाडू घेऊन दोघांनाही मारत आहे. ज्यानंतर ते दोघेही नाल्यातून बाहेर येतात. तिसरी व्यक्ती त्यानंतरही दोघांना मारत आहे.
Naala-Kalesh b/w Two Bois
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 24, 2024
pic.twitter.com/z03a9zXglk
हा व्हिडीओ एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, दोन तरूणांमध्ये नाल्यात भांडण. या व्हिडिओला आतापर्यंत 93 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोक यावर अनेक कमेंट्सही करत आहेत.