Viral Video: आपापसात भिडले दोन गजराज! झाली तुफान लढाई, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:02 IST2022-02-15T12:46:48+5:302022-02-15T13:02:52+5:30
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Elephants Fight Video Viral) झाला आहे. यात दोन हत्ती काहीतरी कारणामुळे भडकलेले दिसतात. रागात या हत्तींनी इतर कोणावर हल्ला केला नाही मात्र ते आपसातच भिडले. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

Viral Video: आपापसात भिडले दोन गजराज! झाली तुफान लढाई, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
हत्तींबद्दल अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की हा अतिशय समजुदार प्राणी आहे. मात्र हत्ती तितकाच रागीटही आहे. रागात हत्ती आपल्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट तोडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Elephants Fight Video Viral) झाला आहे. यात दोन हत्ती काहीतरी कारणामुळे भडकलेले दिसतात. रागात या हत्तींनी इतर कोणावर हल्ला केला नाही मात्र ते आपसातच भिडले. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ 'अ गर्ल हू लव्हज अॅनिमल्स' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला गेला आहे.
बहुतेकदा हत्ती कळपानेच फिरताना आणि एकमेकांसोबतच दिसतात. मात्र, कधीकधी त्यांच्यातही भांडण होतं. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्येही दोन हत्तींमध्ये जबरदस्त फाईट झाल्याचं पाहायला मिळतं. दोन्ही हत्ती आपसात लढताना दिसतात. हे दृश्य धडकी भरवणारं आहे. या हत्तींची लढाई पाहून तुम्हालाही कुस्ती आठवेल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलातील झाडांच्या मध्ये दोन हत्ती आपसात भिडले आहेत. हे पाहून असं वाटतं, जणू दोन लोक घरातील चार भिंतींच्या मध्ये भांडत आहेत, जेणेकरून बाहेरच्या लोकांना समजू नये. मात्र काहीच वेळात ही लढाई झाडांमधून बाहेर मैदानात येते. बराचवेळ दोघांमध्ये जबरदस्त लढाई झाली. दोघंही एकमेकांना सोंडेने मारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यासोबतच एकमेकांना धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र अखेर दोघंही शांत होतात आणि आपल्या आपल्या रस्त्याने निघून जातात.
हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे, मात्र हैराण करणारा आहे. फक्त माणूसच नाही तर शांत दिसणारा हत्तीही आपल्या साथीदारासोबत भिडू शकतो, हे यातून दिसतं. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या किती पसंतीस उतरत आहे याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की आतापर्यंत ८० लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.