शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:11 PM2021-01-25T15:11:24+5:302021-01-25T15:12:48+5:30

हा व्हिडीओ #शंकरपाळ्या असा हॅशटॅग वापरून लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही.

Two children gully fight video goes viral on internet | शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

googlenewsNext

लहान मुलांची भांडणं मजेशीर असतात. ते इतके निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटतं. अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर धुमाकूळ घालत आहे. यात दोन मुले गल्लीत भांडत असून एकमेकांना धमकावत आहे. एकमेकांना मारण्याची भाषा करत आहे. तर दुसरा एकाला शंकरपाळ्या म्हणून शिवीही देतो आहे. 

हा व्हिडीओ #शंकरपाळ्या असा हॅशटॅग वापरून लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला बालपणीच्या तुमच्या अनेक गोष्टी आठवतील. कारण बालपणी प्रत्येकाचंच कुणासोबत तरी भांडण झालेलं असतं.

हा व्हिडीओ कुठला आहे हे नेमकं समजू शकलं नाही. मात्र महाराष्ट्रातील ग्रामीम भागातील आहे. यात दोन मुले खेळता खेळता भांडू लागतात. एकमेकांना धमकावतात. पण लोकांना यातील सर्वात जास्त आवडलेला डायलॉग व्हिडीओच्या शेवटी आहे. यात एक मुलगा दुसऱ्याला 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई' असं म्हणतो. खरंतर त्यांचं सिरीअस भांडण सुरू आहे. पण हा डायलॉग ज्याप्रकारे एकाने म्हटला आपल्याला हसू कोसळतं. 

दोन्ही मुले लहानच आहेत. पण त्यांची भांडणाची स्टाइल लोकांना चांगलीच आवडली आहे. इतकेच काय तर त्यांचे फोटो आणि डायलॉग वापरून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. दोघेही एकमेंकाना हातही लावत नाही. पण त्यांची डायलॉगबाजी लोकांचं मन जिंकून गेली आहे. खरंच बालपण किती भारी असतं ना?
 

Web Title: Two children gully fight video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.