शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

"गर्लफ्रेंडचं लग्न थांबवलं नाही, तुम्हाला शाप लागेल"; संतापलेल्या प्रियकराने काढला मुख्यमंत्र्यांवर राग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:10 AM

आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झालं परंतु तुम्ही काहीच केले नाही असं त्याने म्हटलं

ठळक मुद्देमुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. तुमच्याकडून एवढंही झालं नाही. तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.

पटना – एका संतापलेल्या प्रियकराच्या शापामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार(CM Nitish Kumar) यांची खुर्ची जाईल? नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत? असं आम्ही नव्हे तर एक नाराज झालेला प्रियकराचं म्हणणं आहे. ज्याच्या गर्लफ्रेंडचं बिहारमध्ये लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान लग्न झालं आहे. या प्रियकरानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे लॉकडाऊन काळात लग्नावर निर्बंध आणावेत अशी विनवणी केली होती. जी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. आता त्याने नाराज झालेल्या प्रियकरानं ट्विटरवरून तुम्हाला माझा शाप लागेल अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. नितीश कुमार यांनी ट्विट करून म्हटलं की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बिहारमध्ये ५ मे २०२१ पासून ३ आठवड्यांचं लॉकडाऊन लावलं होतं. आज सहकारी मंत्र्यासोबत याविषयावर चर्चा केली. लॉकडाऊन लावल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं चांगले परिणाम दिसले. त्यामुळे बिहारमधील लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता १ जून २०२१ पर्यंत लॉकडाऊन लागू असेल असं ते म्हणाले.

तुमचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं करू नका

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घोषणेनंतर पंकज कुमार गुप्ता नावाच्या ट्विटर युजरने मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हटलं की, सर, तुमचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं करू नका. तुम्हाला मी विनवणी केली होती, माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. तुमच्याकडून एवढंही झालं नाही. तुम्हाला स्वत:ला मुख्यमंत्री म्हणताना लाज कशी वाटत नाही. आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झालं परंतु तुम्ही काहीच केले नाही असं त्याने म्हटलं.

तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री, स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यायला हवा

इतकचं नाही तर पंकजनं पुढे म्हटलंय की, सर, तुम्ही बिनकामी मुख्यमंत्री आहात. तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. १९ मेपासून मी तुम्हाला कित्येक वेळा मागणी केली होती. माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. परंतु तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त बेरोजगारीमुळे माझं लग्न तिच्यासोबत झालं नाही. तुम्हाला माझा शाप लागेल असं संतापलेल्या प्रियकरानं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राग काढला आहे.    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitish Kumarनितीश कुमारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट