'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, शोधाल तर आनंदाने उड्याही माराल अन् नाचूही लागाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 11:00 IST2020-04-07T10:51:19+5:302020-04-07T11:00:56+5:30

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोमुळे अनेकांची झोप उडाली आहे. कारण त्यांना यात लपलेला कुत्राच सापडत नाहीये.

Tweeples try to spot a pug doggy hidden in the viral picture api | 'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, शोधाल तर आनंदाने उड्याही माराल अन् नाचूही लागाल!

'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, शोधाल तर आनंदाने उड्याही माराल अन् नाचूही लागाल!

सध्या जगभरातील लोक लॉकडाऊनमुळे घरांमध्ये आहेत. अशात इंटरनेट त्यांच्यासाठी फार फायद्याचं ठरत आहे. लोक वेळ घालवण्यासाठी इंटरनेटचा चांगला वापर करत आहेत. अशात काही लोक सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. हा फोटो बारकाईने बघा...काही दिसलं का? या फोटोत एक कुत्रा आहे. हा कुत्रा लोक शोधत आहेत. पण लोकांना काही कुत्रा सापडत नाहीये.

आता तुमचा वेळ जात नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे. तर हीच ती वेळ आहेत तुमच्या नजरेची परीक्षा घेण्याची. हा फोटो बघा आणि त्यातील कुत्रा शोधा. आता याने काय होणार असं विचाराल तर होणार काही नाही. पण तुमचा वेळ चांगला जाईल.

लोकांना हैराण करणारा आणि लॉकडाऊनमध्ये चांगला टाईमपास ठरलेला हा फोटो ट्विटरवर ashqueen नावाच्या यूजरने शेअर  केला. त्याने कॅप्शन लिहिले की, 'जेव्हा तुम्ही कुत्र्याला शोधाल तेव्हा ट्विट रिट्विट करा'. या फोटोला आतापर्यंत अडीच लाख लाइक्स आणि  1 लाख 83 हजारांपेक्षा अधिक रिट्विट मिळाले आहेत. 

Web Title: Tweeples try to spot a pug doggy hidden in the viral picture api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.