Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:57 IST2019-01-23T15:54:24+5:302019-01-23T15:57:10+5:30
गुजरातच्या जूनागढमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात टाकून एका गायीचा जीव वाचवला.

Video : गायीला वाचवताना स्वत: मरता मरता वाचला ट्रक ड्रायव्हर
गुजरातच्या जूनागढमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने आपला जीव धोक्यात टाकून एका गायीचा जीव वाचवला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून ड्रायव्हरचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी हा ट्रक ड्रायव्हर टॅंकर घेऊन वेगाने जात होता. अचानक एक गाय रस्ता ओलांडता ओलांडता रस्त्याच्या मधे थांबली. तेव्हा त्याने जोरात ब्रेक लावला आणि टॅंकर १८० डिग्री फिरुन स्थिर झाला. ती गाय सुरक्षित पुढे निघून गेली.
CCTV footage from Junagadh-Mendarda road. #Gujaratpic.twitter.com/IyykR8rRWj
— Zoo Bear (@zoo_bear) January 21, 2019
ज्याप्रकारे ड्रायव्हरने ब्रेक लावला आणि जसा ट्रक फिरला यात ड्रायव्हरचा जीव जाऊ शकला असता. पण तसं न होतो सुदैवाने गाय सुद्धा वाचली आणि ड्रायव्हरही सुखरुप आहे.
सिंघमच्या सीनसोबत तुलना
या व्हिडीओची तुलना सिंघम सिनेमातील अजय देवगणच्या एका सीनसोबत केली जात आहे.