अतिशाहणपणा नडला! फुकटची स्टाईल मारायला गेली आणि तोंडावर आपटली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:40 IST2021-07-16T15:28:36+5:302021-07-16T15:40:07+5:30
अशी लोक आपली हौस पूर्ण करायला जातात आणि तोंडघशी पडतात. हौसेला मोल नसलं हे खरं असलं तरी त्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी बिघडल्या की हसू होतं.

अतिशाहणपणा नडला! फुकटची स्टाईल मारायला गेली आणि तोंडावर आपटली...
काही जणांना स्टंट करण्याची भारी हौस. आपल्याला झेपत नसलं तरी ते काम करायचं आणि जमलं नाही की आपली फजिती करून घ्यायची ही काही लोकांची सवय असते. अशी लोक आपली हौस पूर्ण करायला जातात आणि तोंडघशी पडतात. हौसेला मोल नसलं हे खरं असलं तरी त्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी बिघडल्या की हसू होतं.
ड्राईव्हिंग करायची हौस प्रत्येकाला असते पण समजा आपल्याला ड्रायव्हिंग जमत नसली तरी शो शायनिंग करायला काही माणसं जातात. एका तरुणीला चालवायची होती बाईक तीही बुलेट. म्हणा मुली आरामात बुलेट चालवतात. पण प्रशिक्षण नसलं तर मुली काय आणि मुलगा काय दोघांचीही फजिती होते. सोशल मिडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय. या व्हिडिओवर अनेकजण हसत आहेत.
व्हिडिओतील तरुणी चालवत असते स्कुटी. स्कुटी वजनाने हलकी असते त्यामुळे ती आरामात चालवत येते. पण खरी गंमत पुढे घडते. ती तरुणी बसायला जाते बुलेटवर. अगदी ऐटीत ही तरुणी बुलेटचा ताबा घ्यायला जाते पण तिला बुलेट काही झेपत नाही आणि तिची चांगलीच फटफजिती होते. गेडी. रुट. चंदिगढ या युजरनं हा व्हिडीओ इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.