VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:03 IST2025-10-25T16:02:58+5:302025-10-25T16:03:22+5:30
Girl wall climbing stunt viral video: सुरूवातीला मुलगी भिंतीकडे बोट दाखवते अन् मग झटक्यात भिंत चढून छतावर पोहोचते

VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
Girl wall climbing stunt viral video: सोशल मीडियावर अनेक गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात. इंटरनेटवर सहसा डान्स व्हिडिओ किंवा स्टंट व्हिडीओ अधिक पसंत केले जातात. दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतो, जो लोकांचे लक्ष वेधून घेतो. सोशल मीडियावर सारेच आपलं टॅलेंट दाखवायचा प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्या एक तरूणी कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतीवर चढते आणि साऱ्यांनाच अवाक् करते. काही लोक तर तिला लेडी स्पायडर वूमनही म्हणताना दिसत आहेत.
अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्यात दिसणारे दृश्य एखाद्या चित्रपटातील स्टंटसारखे वाटते. व्हिडिओमध्ये, एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी असलेली दिसते. सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं, परंतु ती कॅमेऱ्याकडे पाहते आणि मग मागे असलेल्या दोन घरांच्या भिंतींकडे बोट दाखवते. त्यानंतर ती अचानक भिंतींकडे धावत जाते आणि कोणत्याही आधाराशिवाय झटपट भिंतींवर चढू लागते. काही सेकंदात ती संपूर्ण भिंत चढून एका घराच्या छतावरही पोहोचते. पाहा व्हिडीओ-
Spider man pic.twitter.com/FBB8VF0qlp
— Luna (@code_loop_) October 23, 2025
हा व्हिडीओ @code_loop_ अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ एडिट केलेला किंवा रिव्हर्स प्ले केलेला दिसतो. पण बारकाईने पाहिल्यावर मागून रस्त्यावरील वाहने आणि पादचारी सामान्य दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की व्हिडिओ उलट प्ले केलेला नव्हता. म्हणूनच लोक आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की या मुलीने हा पराक्रम नेमका कसा केला.