Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:06 IST2025-07-29T15:05:37+5:302025-07-29T15:06:46+5:30
Donkey Tastes Lemon viral video: या व्हायरल व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत

Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
Donkey Tastes Lemon : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इंटरनेटचा वापर वाढल्यापासून कधीही कोणतीही क्लिप चर्चेत येते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका गाढवाला पहिल्यांदाच लिंबाची चव चाखायला देण्यात आली. त्यावेळी गाढवाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नक्कीच तुम्हालाही हसू येईल.
व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला, एक माणूस आरामात बसून लिंबू सोलतो. तो माणूस लिंबाचा तुकडा तोंडात टाकतो, चव चाखताच आंबट लिंबामुळे त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव येतो. तितक्याात एक गाढव तिथे येते. तो माणूस त्याला गाढवाला लिंबाचा एक मोठा तुकडा खायला घालतो. सुरुवातीला गाढव लिंबू हे सामान्य फळ समजून चावू लागतो आणि त्याचा रस पिण्याच्या प्रयत्न करतो. पण दुसऱ्याच क्षणी त्या आंबट चवीमुळे गाढवाचे दात आंबतात. ते गाढव वेडेवाकडे तोंड करते. पाहा व्हिडीओ-
हा मजेदार व्हिडिओ @ccihancelik_ नावाच्या अकाउंटने इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि अजूनही तो खूप ट्रेंड करत आहे. या व्हिडीओला २३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, कमेंट सेक्शन देखील मजेदार प्रतिक्रियांनी भरलेले आहे. गाढवची ही अवस्था पाहून काही हसताना दिसत आहेत. तर काही जण गाढवाची काळजी करताना पाहायला मिळत आहेत.