VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:46 IST2025-08-05T20:45:27+5:302025-08-05T20:46:04+5:30

Saree Woman dance on Hips Dont Lie: महिलेने अशा अद्भूत डान्स स्टेप्स दाखवल्यात, की अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही व्हिडिओला लाईक केलंय

trending viral video desi woman dance on shakira hips dont lie song video goes viral | VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

Saree Woman dance on Hips Dont Lie: बऱ्याचदा लोकांना असे वाटते की साडी नेसणाऱ्या महिला फक्त पारंपारिक नृत्यच करू शकतात. पण राजस्थानातील जोधपूरच्या कांचन अग्रवतने यांनी असा विचार करणाऱ्यांची धारणा पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या कोलंबियन पॉप गायिका शकीरा हिच्या प्रसिद्ध 'हिप्स डोन्ट लाय' गाण्यावर नाचताना दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या डोक्यावर पदर आहे. तो पदरही न पडू देता त्या अप्रतिम डान्स स्टेप्स कर आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये, कांचन यांचा देशी आणि परदेशी स्टाईलचा कॉम्बो सोशल मीडिया युजर्सना खूप भावलाय. महिलेने साडीमध्ये शकीराच्या गाण्याचे बोल्ड स्टेप्स इतके सुंदरपणे सादर केले आहेत की, लोक तिचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. कांचन यांच्या स्टेप्समध्ये 'देसी टच' आणि पारंपारिक लूकचे एक अद्भुत मिश्रण दिसून येत आहे. पाहा व्हिडीओ-


कांचन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट @kanchan_agrawat वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या महिलेने अशा अद्भुत डान्स स्टेप्स दाखवल्या आहेत, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील या व्हिडिओला लाईक केले आहे.

 

 

Web Title: trending viral video desi woman dance on shakira hips dont lie song video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.