VIDEO: तरुणाने उंचावरून घेतली उडी, पण वेळेवर पॅराशूट उघडलंच नाही, त्यापुढे जे झालं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:11 IST2025-11-28T15:11:16+5:302025-11-28T15:11:57+5:30
Parachute Stunt gone wrong viral video: त्यापुढे जे घडले ते काळजाचा ठोका चुकवणारे होते

VIDEO: तरुणाने उंचावरून घेतली उडी, पण वेळेवर पॅराशूट उघडलंच नाही, त्यापुढे जे झालं....
Parachute Stunt gone wrong viral video: आजकाल लोक स्टंटबाजीच्या मागे लागण्यात वेडेपणाच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. एक छोटीशी चूकदेखील जीवावर बेतू शकते याची त्यांना कल्पना असते. पण तरीही ते असे वागतात. नको ते धाडस करताना अनेकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये एक माणूस उंचावरून मारतो पण त्याचे पॅराशूट वेळेवर उघड नाही. त्यापुढे जे घडते ते काळजाचा ठोका चुकवणारे आहे.
व्हिडिओमध्ये एक माणूस अचानक खूप उंचीवरून उडी मारतो. काही सेकंदांसाठी सर्वकाही सामान्य दिसते, पण तो उतरण्याच्या बेतात असताना पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न करतो, त्याला पॅराशूट उघडायचे असते पण त्यासाठी तो थोडासा उशीर करतो. यामुळे इतक्या वरून उडी घेतलेला व्यक्ती चक्क जोरात पाण्यात आदळतो. पाण्यात पडायच्या दोन सेकंद आधी त्याचे पॅराशूट उघडते पण तोवर उशीर झालेला असतो. त्यामुळे तो पाण्यात आपटतो. त्या माणसाला किती गंभीर दुखापत झाली आहे याची कल्पना नाही, पण असे दिसते की तो बराच जखमी झाला असावा. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडीओ-
हैरान कर देने वाला पल 😱
— Ayesha Khan (@alkuran1650) November 27, 2025
लगता है अब बचना मुश्किल है.... आपकी क्या राय है ? pic.twitter.com/Ce6JHeGdsy
हा भयानक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @alkuran1650 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "धक्कादायक क्षण. आता जीवंत वाचणे अशक्य आहे असे दिसते. तुम्हाला काय वाटते?" १५ सेकंदांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यावर भरपूर प्रतिक्रियाही आल्या आहेत.