VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:53 IST2025-10-16T19:52:45+5:302025-10-16T19:53:17+5:30
Python and woman viral video: महिला अजगराला सहज आपल्या खांद्यावर उचलून घेते

VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
Python and woman viral video: सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, जिथे कुठलीही गोष्ट झटपट व्हायरल होते. त्यातही एखाद्या व्यक्तीच्या धाडसाची गोष्ट असेल तर त्याला जास्त लाइक्स मिळतात, कारण लोकांना त्या गोष्टीचे अप्रूप वाटत असते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ झाला आहे. हा व्हिडिओ एक महिलेचा असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि व्हिडीओ पाहून लोकही थक्क होताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या खांद्यावर एक महाकाय अजगर घेऊन उभी राहताना दिसते. हा अजगर इतका महाकाय दिसतो की त्याला व्हिडीओ पाहूनही अनेकांना भीती वाटू शकते. पण ती महिला मात्र त्या अजगराला कुठल्याही भीतीशिवाय किंवा कोणताही संकोच न करता खांद्यावर उचलून अतिशय सहजपणे वावरताना दिसते. इतकेच नव्हे तर अजगर तिच्या एका पायाभोवती विळखा घालून असल्याचेही स्पष्टपणे दिसते. पण तरीही ती महिला अजिबात घाबरत नाही. उलट, नंतर ती अजगराला हळूवार खांद्यावरून बाजूला करते आणि खाली ठेवते. तिचे धाडस पाहून सारेच थक्क होत आहेत. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर thereptilezoo नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मुक्तपणे कमेंट्सही केल्या असून महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे.