VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:33 IST2025-12-08T19:32:16+5:302025-12-08T19:33:01+5:30
groom dance suprises bride viral video: व्हायरल क्लिपमध्ये चार मुली नवरदेवाला स्टेजवरून डान्स फ्लोअरवर नेतात.

VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
groom dance suprises bride viral video: सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे छोट्या व्हिडीओ पासून मोठमोठ्या मुद्द्यापर्यंत सारंकाही झटपट व्हायरल होतं. बरेचवेळा लग्नात नवरदेव होणाऱ्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी लग्नमंडपात किंवा संगीत सोहळ्यात एखादे सरप्राईज देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये चार मुली नवरदेवाला स्टेजवरून डान्स फ्लोअरवर नेतात. त्यानंतर जे घडते, ते पाहून वधूही आश्चर्यचकित झाल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, वधू आणि वर स्टेजवर बसलेले आहेत. संपूर्ण हॉल पाहुण्यांनी भरलेला आहे. तेवढ्यात, वेस्टर्न पोशाखातील चार मुली स्वॅगमध्ये स्टेजवर येतात. त्यानंतर त्या नवरा-नवरीकडे जातात आणि त्याला सोबत घेऊन डान्स फ्लोअरवर घेऊन येतात. त्यानंतर बादशाह चित्रपटाचे गाणे लागते आणि त्यावर तो नवरदेव भन्नाट डान्स करतो. त्याचा डान्स पाहून बायकोही एकदम खुश होते. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @the_shaadi_shakers या अकाउंटने शेअर केला आहे. फक्त चार दिवसांत, हा व्हिडिओ १ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. नेटकरीही त्यावर धम्माल कमेंट्स करत आहेत.