VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:35 IST2025-11-12T15:34:45+5:302025-11-12T15:35:20+5:30
Horse Dance video: यापूर्वी कधीही घोड्याचे असे नृत्य तुम्ही नक्कीच पाहिले नसेल.

VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
Horse Dance video: इंटरनेटच्या युगात व्हिडीओ किंवा एखादी गोष्ट अतिशय चपळाईने व्हायरल होते. कितीही छोटा व्हिडीओ असो किंवा एखादी क्लिप असो, सोशल मीडियावर ती व्हायरल झाली की त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. राजस्थानचा जगप्रसिद्ध पुष्कर मेळा (Pushka Mela 2025) नेहमीच पारंपारिक उंट आणि घोड्यांसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो. तशातच आता, इंटरनेटवर यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी आणखी एक 'स्टार' चर्चेत आला आहे. हा स्टार म्हणजे जोधपूरचा राणा नावाचा घोडा आहे. तो त्याच्या अफलातून डान्सने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतोय.
या व्हायरल व्हिडिओमध्ये जत्रेत ढोल आणि भांगड्याच्या तालावर एक पांढरा घोडा डोलताना दिसतो. राणा घोडा संगीतात अगदी छान तालावर नाचतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ढोलाचे ताल जसजसे तीव्र होतात तसतसा घोड्याचा उत्साहही वाढतो. तो इतर कोणाकडेही बघत नाही. यापूर्वी कधीही घोड्याचे असे नृत्य तुम्ही नक्कीच पाहिले नसेल. पाहा व्हिडीओ-
इन्स्टाग्रामवर @aryanbikaneri या अकाउंटवरून शेअर केलेला हा अद्भुत व्हिडिओ ८.८ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. एकूणच, नेटिझन्स राणाच्या प्रतिभेने भारावून गेले आहेत.