VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:52 IST2025-09-25T19:46:22+5:302025-09-25T19:52:03+5:30
Pappu Singer viral video: काकांचा व्हिडीओवर सध्या तुफान व्हायरल झालाय

VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
Pappu Singer viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओमुळे आपले डोळे पाणावतात. काही व्हिडीओंनी आश्चर्यचकित व्हायला होते, तर काही व्हिडीओंमुळे आपणच बुचकळ्यात पडतो. सोशल मीडिया हे आपल्या कलागुणांनाही वाव देते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक काका सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचे लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहेत. त्यांचा आवाज ऐकून तुम्हीही नक्कीच त्यांचे फॅन व्हाल.
व्हिडिओमध्ये दिसते की एक वयस्क काका हातात माईक घेऊन गाणे गायला सुरुवात करतात. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्यासारख्याच शैलीत ते "आने से उसके आये बहार" हे गाणे गाण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्या गाण्यातील तालासुराने साऱ्यांनाच थक्क करतात. काकांचा आवाज मोहम्मद रफींच्या आवाजाशी जुळत नसला तरीही त्यांचा प्रयत्न नक्कीच तुम्हाला त्यांचा फॅन होण्यास भाग पाडेल. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर zunedchanda नावाच्या आयडीवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १६ लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. तसेच ९२ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले असून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.