VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:04 IST2025-10-09T16:04:22+5:302025-10-09T16:04:39+5:30
bird swallows live snake video: या व्हिडीओमध्ये एक पक्षी एका जिवंत सापाला गिळून टाकताना दिसतोय

VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
bird swallows live snake video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. कधी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल होते, तर कधी एखादे गाणे चर्चेत येते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्येही अनेक प्रकार दिसून येतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक पक्षी चक्क जिवंत सापाला गिळून टाकतो असे दिसतेय.
एका पक्ष्याचा खूपच धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो जिवंत साप पूर्णपणे गिळताना दिसतो. ही घटना सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आणि जणू काही निसर्गानेच त्या पक्ष्याला सगळी ताकद देऊन टाकलीये असे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, साप जमिनीवर सरकत असताना पक्षी एकदम झपाट्याने हल्ला करतो. त्यानंतर पक्षी सापाला चोचीत धरतो आणि संपूर्ण साप जिवंतपणे गिळून टाकतो. फक्त सापाचा तोंडाचा थोडासा भाग बाहेर राहतो. पाहा व्हिडीओ-
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) October 6, 2025
हा व्हिडिओ X वर @TheeDarkCircle या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सुमारे २२ सेकंदांची ही क्लिप आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याला हजारो लोकांनी लाईक, शेअर आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियेत काहींनी म्हटले आहे की, जंगलचा नियमच आहे मोठा लहानावर सहज विजय मिळवतो. तर काहींनी हे दृश्य अतिशय भयावह असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.