VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:37 IST2025-09-22T16:34:09+5:302025-09-22T16:37:44+5:30
lioness buffalo fight video: अचानक अनेक सिंहिणी तिथे दिसतात, त्यानंतर तर चमत्कारच घडतो

VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
lioness buffalo fight video: सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, त्यामुळे सिंहिणीला जंगलची राणी म्हणतात. वन्यप्राण्यांपैकी कुणीही सिंहीणीशी सहसा वैर घ्यायला जात नाही. कारण सिंहापेक्षाही सिंहिण कुशल शिकारी असल्याचे मानले जाते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहिणींच्या गटाला म्हशींचा कळप पुरून उरल्याचे दिसते. म्हशींचा कळप एक रेडकूला सिंहिणींच्या तावडीतून कसा सोडवतो, ते या व्हिडीओमध्ये दिसते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे यातून एकीचे बळ स्पष्ट दिसते.
व्हिडिओत दिसते की, सिंहिणींचा एक गट म्हशीच्या रेडकूवर हल्ला करतो. जवळच असलेली रेडकूची आई म्हणजेच म्हैस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. सिंहिण रेडकूला आपल्या पकडीत धरतच असते, तितक्यात एक म्हैस आपल्या शिंगांनी सिंहिणीवर हल्ला करते आणि तिला उडवते. त्यानंतर हळूहळू जसा कॅमेरा दूर जातो तसे, त्या माळरानावर खूप सिंहिणी असल्याचे दिसते. त्यामुळे आता रेडकू सिंहिणीच्या तावडीतून वाचणे शक्य नाही असेच वाटते. पण त्यानंतर लगेचच कॅमेरा आणखी दूर जातो तेव्हा म्हशींचा मोठा कळप तेथे असल्याचे दिसते. त्यानंतर थोडा वेळ म्हशी आणि सिंहिणी या दोन गटात लढाई होते. त्यात काय घडतं, पाहा व्हिडीओ-
A mother's power can never be underestimate!
— PREDATOR VIDS (@Predatorvids) September 20, 2025
And friends came to their rescue. pic.twitter.com/SqUgjCsoSz
म्हशींनी दाखवलं एकीचे बळ
हा अंगावर काटा आणणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @Predatorvids या आयडीने शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आईच्या शक्तीला कधीही कमी लेखू नका! त्यांचे साथीदार त्यांच्या मदतीला येतातच. हा ४९ सेकंदांचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.