VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:19 IST2025-10-06T17:37:59+5:302025-10-06T19:19:24+5:30
giraffe fighting lioness viral video: सिहिणींचा कळप बेबी जिराफच्या अंगावर चालून आला त्यावेळी आई जिराफ त्यांना एकटी पुरून उरली

VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
giraffe fighting lioness viral video : सोशल मीडिया हा एक असा घटक आहे, जो सध्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. या सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होतात. कधी एखादे गाणे व्हायरल होते, तर कधी एखाद्या व्हिडीओची चर्चा रंगते. हल्ली वन्यप्राण्यांच्या जंगलातील व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. सध्या जंगलातील सिंहीणींच्या कळपापासून आपल्या पिलाचे संरक्षण करणाऱ्या आई जिराफची एक व्हिडीओ व्हायरल झालीय. त्या व्हिडीओवर अनेक लोक व्यक्तही होत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जंगलातील एक अतिशय रोमांचक दृश्य पाहायला मिळते. सिंहीणींचा एक कळप बेबी जिराफची शिकार करण्यासाठी येतो, परंतु आई जिराफ सिंहीणीच्या कळपाला पुरून उरते. आई जिराफ सिंहीणींच्या हल्ल्यापासून आपल्या पिल्लाचे ज्या धाडसाने रक्षण करते ते साऱ्यांनाच थक्क करणारे आहे. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर wildfriends_africa नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. तसेच, शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून आपापल्या कमेंट्सही दिल्या आहेत. एकाने युजरने लिहिले की, आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणतेही रूप धारण करते, वेळप्रसंगी ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला स्वत:चा जीवही धोक्यात घालू शकते. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ पाहून माझ्या हृदयाला शांतता मिळाली. आईचे प्रेम ही सर्वात मोठी ताकद असते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, जेव्हा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात तेव्हा मला ते पाहावत नाही. मला अशा हिंसेचा तिरस्कार आहे.