परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:35 IST2025-09-20T15:35:16+5:302025-09-20T15:35:50+5:30

man asking hugs korean girls viral video : मुलाच्या विचित्र वागण्यामुळे त्या मुली खूपच अस्वस्थ झाल्याचे दिसले

trending video man makes korean women uncomfortable asking for hug viral clip on internet social media | परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

man asking hugs korean girls viral video : सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांचा संताप झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भारतात येणाऱ्या दोन परदेशी मुलींशी गैरवर्तन करून त्यांना त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे इंटरनेटवर या टपोरी मुलावर टीका होत आहे, तसेच काहींच्या म्हणण्यानुसार, अशा वर्तणुकीमुळे भारताच्या जागतिक प्रतिमेला हानी पोहोचत असल्याचेही बोलले जात आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्लीच्या इंडिया गेटचा आहे. तिथे दोन कोरियन मुली चालताना दिसतात. एक तरुण त्यांच्याकडे येतो आणि त्यांच्याशी जबरदस्ती संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. सेल्फी कॅमेराने त्या सगळ्याचे चित्रीकरण करण्याचाही प्रयत्न करतो. तो तरुण त्या परदेशी मुलींना मिठी मारायची मागणी करतो. सुरुवातीला मुली त्याला नकार देतात. पण तो मुलगा खूपच जास्त त्रास देत राहतो. अखेर त्यातली एक मुलगी त्याला कंटाळून बळजबरी मिठी मारते. दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगून जातात की, त्या खूपच अस्वस्थ (uncomfortable) आहेत. पाहा व्हिडीओ-


@jaystreazy नावाच्या कंटेंट क्रिएटरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ २.३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय नेटकरी संतापल्याचे दिसून आले. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये "Sorry from India" असेही लिहून त्या परदेशी पाहुण्यांची माफीही मागितली आहे.

Web Title: trending video man makes korean women uncomfortable asking for hug viral clip on internet social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.